परमबीर सिंग खंडणी प्रकरणी ठाणे पोलिसांनी केली दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 10:04 PM2021-08-07T22:04:53+5:302021-08-07T22:05:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे: यूएलसी घोटाळ्यातील आरोपीवर मकोकाची कारवाई करण्याची धमकी देत त्याचे पुतणे शरद अग्रवाल यांच्याकडून चार कोटी ...

Thane police arrest two in Parambir Singh case | परमबीर सिंग खंडणी प्रकरणी ठाणे पोलिसांनी केली दोघांना अटक

परमबीर सिंग खंडणी प्रकरणी ठाणे पोलिसांनी केली दोघांना अटक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: यूएलसी घोटाळ्यातील आरोपीवर मकोकाची कारवाई करण्याची धमकी देत त्याचे पुतणे शरद अग्रवाल यांच्याकडून चार कोटी ६८ लाखांची खंडणी उकळणाऱ्या आरोपींपैकी संजय पुनमिया आणि संजय जैन या दोघांना कोपरी पोलिसांनी शुक्रवारी मुंबईतून  अटक केली आहे. त्यांना १२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि उपायुक्त पराग मणेरे यांच्यासह पाच जणांविरुद्ध हा गुन्हा दाखल झाला आहे.

परमबीर सिंग यांच्याविरोधात २३ जुलै रोजी ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात खंडणीचा हा गुन्हा दाखल झाला आहे. शरद अग्रवाल यांच्याकडून 2 कोटींची खंडणी आणि 2 कोटी 68 लाख रुपये किमतीची जमीन बळकावल्याचा आरोप सिंग यांच्यावर  असून याप्रकरणी  कलम 384, 385, 388, 389, 420, 364 ए, 34, 120 बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर यांच्या व्यतिरिक्त संजय पुनमिया, सुनील जैन, मनोज घोटकर आणि पराग मनेरे यांचीही नावे या गुन्ह्यात सहआरोपी म्हणून आहेत.

या गुन्ह्यातील तक्रारदार शरद अग्रवाल यांनी कोपरी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, परमबीर हे ठाण्याचे पोलीस आयुक्त असतांना त्यांनी  आणि तत्कालीन उपायुक्त  पराग मनेरे यांनी मोक्काच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत 2 कोटींची रोख खंडणी वसूल केली होती. तसेच 2 कोटी 68 लाख रुपयांचा एक भूखंड देखील बळकावला होता. हा प्रकार नोव्हेंम्बर 2016 ते मे 2018 या काळात घडल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे.

हा सारा घटनाक्रम कोपरी येथील पोलीस आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानी  घडला होता.  दरम्यान, या घटनेतील आरोपी संजय पुनमिया आणि सुनील जैन या दोघांनाही शुक्रवारी कोपरी पोलिसांनी मुंबईतून अटक केली. अटकेतल्या दोघांना शनिवारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने दोघांना 12 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Web Title: Thane police arrest two in Parambir Singh case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.