बॉयफ्रेंडसोबत बोलत होती मुलगी, रागाच्या भरात बापाने केली हत्या अन् मृतदेह फेकला नदीत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 09:01 PM2022-05-25T21:01:48+5:302022-05-25T21:04:42+5:30

Murder Case : ही 20 वर्षाची मुलगी आपल्या प्रियकराशी फोनवर बोलत होती. त्यामुळे तिच्या संतापलेल्या वडिलांनी तिची हत्या केली आहे. इतकंच नाही तर मृतदेह नदीत फेकून दिला. आरोपी वडिलांचं नाव उस्मान असं आहे. 

The girl was talking to her boyfriend when her father killed her in anger and threw her body in the river | बॉयफ्रेंडसोबत बोलत होती मुलगी, रागाच्या भरात बापाने केली हत्या अन् मृतदेह फेकला नदीत

बॉयफ्रेंडसोबत बोलत होती मुलगी, रागाच्या भरात बापाने केली हत्या अन् मृतदेह फेकला नदीत

googlenewsNext

पाटणा :  बिहार राज्यातून प्रेयसी प्रियकरासोबत फोनवर बोलत होती, म्हणून तिच्या वडिलांनी तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.  ही 20 वर्षाची मुलगी आपल्या प्रियकराशी फोनवर बोलत होती. त्यामुळे तिच्या संतापलेल्या वडिलांनी तिची हत्या केली आहे. इतकंच नाही तर मृतदेह नदीत फेकून दिला. आरोपी वडिलांचं नाव उस्मान असं आहे. 

बिहार राज्यातील दरभंगा जिल्ह्यातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र, मुलीच्या हत्येचा ऑडिओ व्हायरल झाल्याने तिच्या बापानेच तिची हत्या केल्याचे समोर आले आहे. यानंतर मृताची आई, बहीण आणि मामा यांनी ही ऑडिओ क्लिप पुरावा म्हणून पोलिसांना दिली आहे.  ही घटना बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील मोरो पोलीस ठाणे क्षेत्रातील रतनपुरा गावातील आहे.

जेवण बनवावे लागते म्हणून घरातून पळाली मुलगी, यूपीतून थेट गाठलं ठाणं अन्...

 20 वर्षांची मुलगी आफरीन हिचे लग्न तिच्या वयापेक्षा मोठ्या वयाच्या मुलासोबत निश्चित झाले होते. तर तेच दुसरीकडे आफरीनचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेमप्रकरण सुरू होते. ही गोष्ट घरातील सर्व सदस्यांना माहित होती. आफरीनला आपल्या प्रियकरासोबत बोलण्यास वडिलांनी मनाई केली होती. मात्र, असे असतानाही आफरीन तिच्या प्रियकराशी लपूनछपून बोलायची. असेच एक दिवशी ती तिच्या प्रियकराशी मोबाईलवर बोलत होती. यावेळी तिचे वडील आले आणि प्रियकराशी बोलताना पाहून संतापला. यानंतर त्याने रागाच्या भरात आफरीनला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि तिची हत्या करुन टाकली. 15 मे ही घटना घडली. यानंतर हत्या करण्यात आल्यानंतर तिचा मृतदेह हा नदीत फेकून देण्यात आला होता. तसेच ती हरवली आहे, असे गावात बतावणी केली. त्याच्या दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली.

Web Title: The girl was talking to her boyfriend when her father killed her in anger and threw her body in the river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.