घरात सापडला मुलीचा रक्ताने माखलेला मृतदेह, अंगावर अनेक जखमांच्या खुणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 01:22 PM2022-05-30T13:22:15+5:302022-05-30T13:25:14+5:30
Murder Case : प्रेमप्रकरणातून तरुणीचा खून झाल्याची चर्चा परिसरात आहे. या प्रकरणात भीषण हत्या झाल्याची भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह घरात संशयास्पद अवस्थेत आढळून आला आहे. मुलीचे कुटुंबीय परतल्यावर घरात आरडाओरडा झाला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला. प्रेमप्रकरणातून तरुणीचा खून झाल्याची चर्चा परिसरात आहे. या प्रकरणात भीषण हत्या झाल्याची भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
एएसपी लक्ष्मी निवास मिश्रा यांनी सांगितले की, घरात मृतदेह आढळल्याने प्रकरण संशयास्पद वाटत आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन मृत्यूचे कारण जाणून घेण्यासाठी शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. हे प्रकरण कामसीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. मुलगी घरीच होती, असे मृत मुलीच्या नातेवाईकांनी सांगितले. आई-वडील बाहेर गेले होते. दरम्यान, कोणीतरी तरुणीची हत्या केली. तिच्या पोटात जखम झाली आहे. शरीरावर अनेक ठिकाणी जखमांच्या खुणा आहेत. मुलगी 15 वर्षांची होती आणि यावर्षी तिने 10वीचा पेपर दिला.
फॉरेन्सिक टीम आणि फील्ड युनिटसह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि घटनेचा तपास केला. सोबतच प्रेमप्रकरणातून भीषण हत्या झाल्याची भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनाही घरात मृतदेह आढळल्याने प्रकरण संशयास्पद वाटत आहे. पोलीस स्टेशन प्रभारी उमेश कुमार यांनी सांगितले की, केवळ जवळची व्यक्तीच ही घटना घडवून आणू शकते, परंतु पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि तपासाशिवाय ठोस काही सांगता येणार नाही.
हॉरर किलिंगच्या प्रश्नावर स्टेशन प्रभारी म्हणाले की, प्रत्येक ठिकाणी तपास केला जात आहे. तपासात सत्य बाहेर येईल. डीएसपी सियाराम यांनी सांगितले की, कामसीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावप्रमुखाने घराच्या मागील खोलीत एका मुलीचा मृतदेह असल्याची माहिती दिली होती. पोलिसांनी तातडीने पुढील तपास सुरू केला. मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नाही, कारण जाणून घेण्यासाठी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. अद्यापपर्यंत कुटुंबीयांनी कोणतीही तक्रार दिलेली नाही. घटनेचा तपास करण्यात येत आहे.