शेगावात माजी सैनिकाच्या घरी चोरी; रोख रकमेसह सोन्या चांदीच्या  दागिने लंपास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 03:43 PM2018-07-20T15:43:38+5:302018-07-20T15:46:13+5:30

शेगाव -येथील  माजी सैनिकांचा घरात घुसून  सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कमेसह 31740 रू. चा मुद्देमाल  चोरट्यांनी  लंपास केल्याची घटना 19 जुलैच्या रात्री  स्थानिक रेणुका  नगरात घडली.

Thept in ex-soldier's home in Shegaon | शेगावात माजी सैनिकाच्या घरी चोरी; रोख रकमेसह सोन्या चांदीच्या  दागिने लंपास 

शेगावात माजी सैनिकाच्या घरी चोरी; रोख रकमेसह सोन्या चांदीच्या  दागिने लंपास 

googlenewsNext
ठळक मुद्देघराचे दरवाज्याची कडी तोडून किचनरूममधून आतमध्ये प्रवेश केला. एकूण 31740 रू चा मुद्देमाल  चोरट्यांनी चोरून नेला. शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा  केला.

शेगाव -येथील  माजी सैनिकांचा घरात घुसून  सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कमेसह 31740 रू. चा मुद्देमाल  चोरट्यांनी  लंपास केल्याची घटना 19 जुलैच्या रात्री  स्थानिक रेणुका  नगरात घडली.
येथील  रेणुका  नगरातील रहिवासी तथा माजी सैनिक  अशोक मोरे वय 56  यांचे घराचे दरवाज्याची कडी तोडून किचनरूममधून आतमध्ये प्रवेश केला. एका रूममध्ये  सुनेला व दुसरे  रूममध्ये  माजी सैनिक अशोक मोरे व पत्नी ला कोंबून ठेवले व दोन्ही  घरातील कपाटातून सोन्या  चांदीच्या  दागिने  तसेच माजी सैनिक अशोक मोरे  यांच्या  पॅटच्या खिशातील रोख 7500 रू व पत्नीचे पर्समधील 2000 रू असा एकूण 31740 रू चा मुद्देमाल  चोरट्यांनी चोरून नेला. घरात अनोळखी तिघे जण होते. दोघांनी पॅट शर्ट तर एकाने बनियाने अंगात  घातलेले  होते अशी माहिती  माजी सैनिक  अशोक मोरे  यांनी  दिली. शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा  केला. ठसे तज्ञांनी पाचारण करण्यात आले. याप्रकरणी  माजी सैनिक  अशोक मोरे यांनी  फिर्याद दिली आहे. त्यानुसार  शहर पोलिसांनी  चोरट्यांविरुद्ध  कलम 457, 380, 34 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास  ठाणेदार डी डी ढाकणे यांच्या  मार्गदर्शनाखाली  पी एस आय पाटील    करीत आहेत.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Thept in ex-soldier's home in Shegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.