- संदीप झीरवाळलोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : नाशिक पोलिस आयुक्तालयातील सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याच्या अमृतधाम परिसरात राहणाऱ्या भावाच्या बंगल्याचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे दहा लाख रुपयांची घरफोडी केल्याची घटना शुक्रवारी (दि.१७) उघडकीस आली आहे. याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याच्याच भावाच्या बंगल्यात धाडसी घरफोडीची घटना घडल्याने सर्वसामान्य जनतेचे काय असा सवाल नागरिकांनी केला आहे. या धाडसी घरफोडी प्रकरणी अजित सुनिल पवार यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पवार यांचा एसएसडी नगर बाजुला मातोश्री नावाचा बंगला असून पवार कामानिमित्त ठाणे येथे गेले असता (दि. १३ ते १७) कालावधीत कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद बंगल्याचे तळ मजल्यावर असलेले शटरचे कुलूप तोडून बंगल्याच्या मुख्य दरवाजाचे लॅच तोडून घरात प्रवेश करून हॉल व बेडरूममध्ये असलेल्या लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून त्यात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने, रोकड असा ९ लाख ९९ हजार ५० रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. बंगल्यात घरफोडी झाल्याच्या घटनेची माहिती परिसरात राहणाऱ्या काही नागरिकांनी शिवसेनेचे पदाधिकारी दिगंबर मोगरे यांना कळविली त्यानंतर मोगरे यांनी पवार यांना फोन करून घरफोडी झाल्याची माहिती
दिल्यानंतर पवार यांनी नाशिक गाठून पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. भरवस्तीत घडलेल्या या घरफोडीच्या घटनेमुळे पोलिस प्रशासन सुस्त झाल्याची चर्चा परिसात रंगली आहे.
देवघरतील देवही चोरलेचोरट्यांनी पवार यांच्या घरात प्रवेश केल्यावर लोखंडी कपाटाचे लॅच तोडून दागिने रोकड लंपास केली. तसेच देवघरतील देवही चोरले आहेत.