धक्कादायक! प्रेम विवाह केला म्हणून बापानं पेपर कटरनं मुलीचा गळा कापला 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 06:58 PM2021-08-16T18:58:35+5:302021-08-16T19:00:09+5:30

तामिळनाडूच्या थिरुप्पुरमध्ये एका बापानं आपल्याच पोटच्या पोरीचा गळा कापण्याचा प्रयत्न केला आहे.

thiruppur man attempts to slice daughters neck with a paper cutter | धक्कादायक! प्रेम विवाह केला म्हणून बापानं पेपर कटरनं मुलीचा गळा कापला 

धक्कादायक! प्रेम विवाह केला म्हणून बापानं पेपर कटरनं मुलीचा गळा कापला 

Next

तामिळनाडूच्या थिरुप्पुरमध्ये एका बापानं आपल्याच पोटच्या पोरीचा गळा कापण्याचा प्रयत्न केला आहे. दैव बलवत्तर म्हणून मुलीचा जीव वाचला आहे. मुलीनं तिच्या पसंतीनुसार लग्न केलं म्हणून वडील नाराज होते. याचाच संताप डोक्यात घेत पेपर कटरच्या सहाय्यानं मुलीचा गळा कापण्याचा प्रयत्न केला. यात मुलगी जखमी झाली आहे. 

आरोपी एक चित्रकार असून गेल्या १५ वर्षांपासून ते चित्रकाराचं काम करत आहेत. त्यांची १९ वर्षीय मुलगी प्रियांका हिनं २५ वर्षीय मोहम्मद यासीन याच्यासोबत प्रेम विवाह केला. दोघांची एका गार्मेंट फॅक्ट्रीमध्ये ओळख झाली होती. याच ओळखीचं पुढे जाऊन प्रेमात उपांतर झालं. दोघंही गेल्या चार वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते. दोघांच्या नात्याबाबत प्रियांकाच्या वडिलांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी दोघांनाही संबंध तोडून टाकण्याचा इशारा दिला होता. प्रियांकाला त्यांनी आपल्या बहिणीच्या घरी सोडलं होतं. याच दरम्यान प्रियांका आणि यासीन यांनी १६ जुलै रोजी पळून जाऊन लग्न केलं. यानंतर प्रियांका यासीनसोबत त्याच्या घरी राहू लागली. 

शनिवारी प्रियांका एकटीच घरी होती. यातच दारूच्या नशेत असलेले तिचे वडील तिच्या घरात शिरले आणि स्वत:च्या मुलीवरच हल्ला चढवला. एक पेपर कटर हातात घेऊन त्यांनी प्रियांकाच्या गळ्यावर वार केला आणि पळ काढला. प्रियांकानं आरडाओरड केल्यामुळे शेजारी तात्काळ घरी आले आणि घडलेला प्रकार पाहून सर्वांनाच धक्का बसला. शेजाऱ्यांनी तातडीनं प्रियांकाला रुग्णालयात दाखल केलं. सुदैवानं प्रियांकाचा जीव वाचला. 

Web Title: thiruppur man attempts to slice daughters neck with a paper cutter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.