लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुणे येथील रहिवासी प्रभाकर भोसले यांना सात कोटींच्या थकित कर्जावर आणखी ३ कोटींचे कर्ज न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देणारा फोन कर्जदार प्रभाकर भोसले यांचे नातेवाईक बाबासाहेब कदम यांनी २१ नोव्हेंबरला दुपारी ३.५३ वाजता धरमपेठ महिला मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी, नागपूर या संस्थेचे मुख्य सल्लागार किशोर बावने यांना केला.या धमकीची तक्रार बावने यांनी नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय आणि बजाजनगर व सीताबर्डी पोलीस ठाण्यात नोंदविली आहे.प्राप्त माहितीनुसार, संस्थेने प्रभाकर भोसले यांना पुणे शाखेतून संकल्प कन्स्ट्रक्शनला पाच कोटींचे कर्ज दिले आहे. तसेच पत्नी वंदना भोसले, मुलगा व मुलीच्या नावे दोन कोटी असे एकूण सात कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. कर्ज खाते थकित झाले असून याबाबत संस्थेने फोन करून त्यांना सूचना दिली असून नोटीस जारी केला आहे. त्यानंतरही प्रभाकर भोसले यांनी मला जोपर्यंत वाढीव तीन कोटी कर्ज मिळत नाही तोपर्यंत कर्ज रक्कम भरणार नाही आणि माझे ३० लाखांचे शेअर्स मला परत करावे, असे म्हटले आहे.या संदर्भात प्रभाकर भोसले यांचे नातेवाईक बाबासाहेब कदम हे नागपूरला वाढीव कर्जासाठी संस्थेच्या कार्यालयात आले होते. माझा पुतण्या आमदार, नातेवाईक खासदार आणि पोलीस विभागात मोठ्या पदावर कार्यरत असल्याने तुम्ही कोणतीही कारवाई करू शकत नाही. वाढीव कर्ज तुम्हाला द्यावेच लागेल, असे कदम यांनी म्हटले होते.बावने यांनी सांगितले की, मी संस्थेचा सल्लागार असल्यामुळे मला पुणे येथे नेहमीच बैठका असतात. तसेच प्रकृती ठीक नसल्यामुळे तपासणीसाठी मुंबईला नेहमीच जावे लागते. व्यवहाराच्या तपासणीसाठी इतर शाखांमध्ये दौर करावे लागतात. धमकीनंतर भीती निर्माण झाली आहे. या घटनेची तक्रार पोलीस आयुक्त आणि बजाजनगर व सीताबर्डी पोलीस ठाण्यात केली आहे.
किशोर बावने यांना जीवे मारण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 8:18 PM
सात कोटींच्या थकित कर्जावर आणखी ३ कोटींचे कर्ज न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देणारा फोन कर्जदार प्रभाकर भोसले यांचे नातेवाईक बाबासाहेब कदम यांनी २१ नोव्हेंबरला दुपारी ३.५३ वाजता धरमपेठ महिला मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी, नागपूर या संस्थेचे मुख्य सल्लागार किशोर बावने यांना केला.
ठळक मुद्देनागपूरच्या धरमपेठ महिला मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे मुख्य सल्लागारथकित कर्जदाराच्या नातेवाईकाचा फोन : वाढीव कर्ज देण्याची मागणी