बँकेतील चोरीप्रकरणी तिघांना पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 11:25 PM2019-03-12T23:25:38+5:302019-03-12T23:29:38+5:30
आरोपींकडून 11 हजारांची चिल्लर जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे
मुंबई - महेश्वरी उद्यान येथील राष्ट्रीयकृत बँकेत झालेल्या 16 हजार सातशे रुपयांची चिल्लर चोरीप्रकणी माटुंगा पोलिसांनी तिघांच्या अटक केली आहे. आरोपींकडून 11 हजारांची चिल्लर जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
महेश्वरी उद्यान येथे राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेत 1 फेब्रुवारीला चोरी झाली होती. बँकेच्या मागच्या बाजूला असलेल्या शौचालच्या खिडकीतून चोरटे आत घुसले होते. चोरांनी बँकेतील लॉकर खोलण्याचा प्रयत्न केला. मात्र,त्यांना ते शक्य झाले नाही. त्यामुळे तेथे ड्रॉव्हरमध्ये एक रुपये किंमतीच्या नाण्यांनी भरलेल्या सहा पिशव्या घेऊन चोरटे पळाले होते. त्या पिशव्यांमध्ये 16 हजार सातशे रुपये होते. बँकेतील सीसीटीव्हीत आरोपींचे चेहरे स्पष्ट दिसत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी परिसरातील दुकानदारांना याबाबत सावध करून कोणी नाणी घेऊन दुकानात आल्यास तत्काळ पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन केले होते. अखेर आरोपींनी तीच चूक केली आणि ते पोलिसांच्या हाती लागले. बँकेतील चिल्लर चोरून पसार झालेल्या काशीनाथ पेंढारकर, चेतन घायतडके आणि प्रसन्ना बांद्रे या तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यांचा सहकारी अनिकेत सिंगचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपींनी वडाळा परिसरात दारु खरेदी करण्याचीसाठी या चोरीच्या पैशांचा वापर केल्याचे चकशीत सांगितले आहे.