विमानतळावरून तीन कोटींचं सोनं जप्त; ३ श्रीलंकन नागरिक ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 06:08 PM2019-02-18T18:08:06+5:302019-02-18T18:09:08+5:30
एआययूने केलेल्या कारवाईत तीन श्रीलंकन नागरिकांमध्ये २ महिला आणि १ अल्पवयीन मुल आहे.
मुंबई - मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमाशुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर विभागाने (एअर इंटेलिजन्स युनिट -एआययू) आज मोठी कारवाई करत १०,८१६ ग्रॅम सोन्याची बिस्किटं जप्त केली आहेत. तसेच ३ कोटी ३१ लाख ६० हजार किंमत असलेली सोन्याची बिस्किटं घेऊन येणाऱ्या तीन श्रीलंकन नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
एआययूने केलेल्या कारवाईत तीन श्रीलंकन नागरिकांमध्ये २ महिला आणि १ अल्पवयीन मुल आहे. आरोपीने सोन्याची तस्करी कोणासाठी केली होती याचा तपास एआययू करणार असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाच्या आयुक्त व्ही. रमा मॅथ्यू यांच्या दिली.
Mumbai: Air Intelligence Unit, CSMI Airport intercepted 3 Sri Lankan nationals (2 women & a minor) carrying 10816 grams of gold worth Rs 3,31,60,017. The gold was seized under provisions of the Customs Act & the passengers were arrested, minor was produced before a juvenile court pic.twitter.com/W6eyjwiYzo
— ANI (@ANI) February 18, 2019