भिवंडी : भिवंडीत वाहन चोरांनी थैमान घातला असल्याने वारंवार होणाऱ्या वाहन चोरीच्या घटनांनी वाहन चालक हिरं झाले होते . रोजच्या वाहन चोरीच्या घटनांना आळा बसावा यासाठी भिवंडी परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी शहरातील सहाही पोलीस ठाण्यांना वाहन चोरांच्या मुसक्या आवळण्याचा अदेश दिले होते.
त्यांनतर नारपोली पोलिसांनी वाहन चोरी प्रकरणातील तीन वाहनांचा शोध घेतला असून याप्रकरणी तीन वाहन चोरट्यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती शुक्रवारी नारपोली पोलिसांनी दिली आहे . दर्शक कीर्ती हरनिया ( वय 23 रा .अंजूरफाटा ) यांची शाईन मोटर सायकल चोरी झाली होती याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता . नारपोली पोलिसांनी तपास करून आरोपी इस्तियाक लियाकत अली अंसारी उर्फ पंजाबी ( वय 35 ) यास अटक करून चौकशी केली असता सदर मोटर सायकल त्याने काल्हेर येथून चोरी केल्याची कबुली दिली आहे . दुसऱ्या घटनेत फिरोज इब्राहिम शेख ( 27 ) यांची ऍक्टिव्हा दुचाकी चोरीला गेली होती . याप्रकरणी अन्वर मुक्तार सय्यद ( 22 रा . साकीनाका मुंबई ) यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली आहे.
तर तिसऱ्या घटनेत सत्यवान बबन शेट्ये ( 45 ) यांची रजिस्टर न झालेली नवीन मोटर सायकल चोरीला गेली होती सदर गाडी चोरी प्रकरणी आरोपी सैफ जलालुद्दीन अंसारी ( 21 रा . जैतुनपुरा ) यास अटक केल्या नंतर त्याने वाहन चोरीची कबुली दिली आहे . विशेष म्हणजे या तिन्ही मोटर सायकल या तीनही चोरट्यांकडून पोलिसांनी हस्तगत केल्या असल्याची माहीती नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी दिली आहे .