फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 07:47 PM2020-01-16T19:47:27+5:302020-01-16T19:47:54+5:30

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार केले.

Torture on a young girl threatening to photo viral | फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार

Next

जळगाव : मित्र म्हणून कोल्हे हिल्स व मुंबई येथे फिरायला गेले असता तेथे काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी योगेश लोंढे (रा.कंजरवाडा, जळगाव) याच्याविरुध्द गुरुवारी रामानंद नगर पोलीस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, हा गुन्हा नंतर शून्य क्रमांकाने तालुका पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील १९ वर्षीय तरुणीची २०१६ मध्ये महाविद्यालयात शिक्षण घेत असताना तेथे शिक्षण घेत असलेल्या योगेश लोंढे विद्यार्थ्याशी तिची ओळख निर्माण झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. या मैत्रीतून योगेश याने प्रेमाचा प्रस्ताव ठेवला, मात्र तरुणीने लग्न झालेले असल्याने प्रेमास नकार दिला.

मात्र त्यानंतर योगेश याने कोल्हे हिल्स परिसरात भेटण्यासाठी बोलावले असता तेथे त्याने मुंबईला फिरायला गेले तेव्हाचे तसेच कोल्हे हिल्स येथील सोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार केला. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने घरी काहीच सांगितले नाही, मात्र त्यानंतरही त्याचा त्रास सुरुच होता.

लग्न कर नाही तर एक लाख रुपये दे

तरुणी दोन वर्षापासून पतीपासून विभक्त राहत असल्याने योगेश याने तरुणीच्या मागे प्रेम आणि लग्नासाठी तगादा लावला होता. त्याला तरुणीने विरोध केला, त्यामुळे योगेश याने तरुणीच्या भावाच्या मोबाईलवर फोटो पाठवून बदनामी करण्याची धमकी दिली. माझ्याशी लग्न करायला लाव नाही तर एक लाख रुपये तेव्हाच मी तिला सोडेल असे तो धमकावू लागला. त्रास असह्य झाल्याने पीडित तरुणीने गुरुवारी रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. तेथे योगेश याच्याविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल झाला, मात्र घटनास्थळ तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याने हा गुन्हा रात्री तिकडे वर्ग करण्यात आला.

Web Title: Torture on a young girl threatening to photo viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.