साकोली (भंडारा) - साकोली तालुक्यातील वडद येथे जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या दोन विद्यार्थीनीचा पाण्यात बुडून करूण अंत झाला. साधना ताराचंद नेवारे (९) व त्रिशाली चोपराम आंबेडारे (१२) दोन्ही रा. वडद असे मृत मुलींची नावे आहेत. ही घटना शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास उघडकीला आली. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.शनिवारला शाळेची सुटी झाल्यानंतर त्या दोघेही घरी आल्या. एका लहान मुलाला शेतात पोहचावयाला दोन्ही गेल्या होत्या. शेतातून घरी परत येत असताना चिखलानी पाय भरले. पाय धुण्याकरिता गाव तलावाजवळील मुरमाच्या खदानीत त्या उतरल्या. खदानीतील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्रिशाली व साधना या दोघींचा बुडून मृत्यू झाला. दुपारनंतर दोघेही दिसून न आल्याने त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र रात्री १० वाजताच्या सुमारास खदानितील पाण्यात चप्पल तरंगताना दिसली. खदानीतून दोघींचाही मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्रिशाली ही पारडी येथील रहिवासी असून ती वळद येथे आजीकडे राहत होती, अशी माहिती मुख्याध्यापक नरेंद्र गायधने यांनी दिली.
दोन विद्यार्थीनींचा पाण्यात बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 8:04 PM
ही घटना शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास उघडकीला आली.
ठळक मुद्दे साधना ताराचंद नेवारे (९) व त्रिशाली चोपराम आंबेडारे (१२) दोन्ही रा. वडद असे मृत मुलींची नावे आहेत. दुपारनंतर दोघेही दिसून न आल्याने त्यांचा शोध घेण्यात आला. शनिवारला शाळेची सुटी झाल्यानंतर त्या दोघेही घरी आल्या.