भाजपा आमदारावर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप, FIR दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 02:03 PM2021-02-05T14:03:23+5:302021-02-05T14:20:42+5:30

Crime News : तक्रारीनंतर आमदार प्रतापलाल भिल यांच्याविरोधात गोगुंडा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे

udaipur bjp mla from gogunda prataplal bhil faces serious allegations of sexual exploitation case registered | भाजपा आमदारावर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप, FIR दाखल

भाजपा आमदारावर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप, FIR दाखल

Next
ठळक मुद्देया प्रकरणाची चौकशी सीआयडी सीबी करणार आहे.

उदयपूर : मेवाडमधील उदयपूर जिल्ह्यातील गोगुंदा विधानसभा मतदार संघातील (Gogunda Assembly Seat) भाजपाआमदार प्रतापलाल भिल (BJP MLA Prataplal Bhil) यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. प्रतापलाल भिल यांच्यावर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. या महिलेने उदयपूर रेंजचे आयजी सत्यवीर सिंह यांच्यासमोर हजर होऊन आपली तक्रार दाखल केली आहे.

या तक्रारीनंतर आमदार प्रतापलाल भिल यांच्याविरोधात गोगुंदा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. मात्र, हे प्रकरण आमदाराशी संबंधित असल्याने याची चौकशी करण्यासाठी राज्य मुख्यालयामार्फत सीआयडी सीबीकडे पाठविले जाणार आहे. तर दुसरीकडे, अशा कोणत्याही प्रकरणाची आपल्याला माहिती नसल्याचे आमदार प्रतापलाल भिल यांनी सांगितले आहे.

पीडित महिला मूळची मध्य प्रदेशातील नीमच भागातील आहे, असे उदयपूरचे पोलीस अधीक्षक डॉ. राजीव पचार यांनी सांगितले. तर तीन वर्षांपूर्वी एका सामाजिक कार्यक्रमादरम्यान आमदार प्रतापलाल भिल यांची भेट घेतली होती. यानंतर या आमदारांनी आपल्याशी जवळीक वाढवली. यादरम्यान अनेकदा लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले, असा आरोप पीडित महिलेने केला आहे. 

याचबरोबर, आमदार प्रतापलाल भिल यांनी उदयपुरातील सुखेर आणि नीमचमधील फ्लॅटमध्ये शारीरिक संबंध ठेवले होते. यानंतर आमदार आता लग्नाच्या आश्वासनापासून लांब जात आहेत, त्यामुळे त्यांच्याविरोधात तक्रार घेऊन आयजीसमोर हजर झाली, असे पीडित महिलेने सांगितले.

सदर प्रकरणाचे गांभीर्य पाहून उदयपूर पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून आमदार प्रतापलाल भिल यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे. हे प्रकरण सीआयडी सीबीकडे तपासासाठी पाठविले जाणार आहे. या प्रकरणाची चौकशी सीआयडी सीबी करणार आहे. याआधी पोलिसांनी संबंधित महिलेलची वैद्यकीय तपासणी केली आहे. 

दुसरीकडे, आमदार प्रतापलाल भिल यांनी अशा प्रकारच्या कोणत्याही गुन्ह्याची नोंद असल्याची माहिती फेटाळून लावली आहे. प्रतापलाल भिल हे सलग दुसऱ्यांदा गोगुंदा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत.

Web Title: udaipur bjp mla from gogunda prataplal bhil faces serious allegations of sexual exploitation case registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.