दुर्दैवी! ज्या झाडाने पोटाची खळगी भरण्यास साथ दिली; त्यानेच घेतला जीव 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 08:21 PM2019-09-27T20:21:44+5:302019-09-27T20:24:53+5:30

आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास हे झाड कोसळलं आहे. 

Unfortunately! The tree that helped to fill the stomach; that tree took life | दुर्दैवी! ज्या झाडाने पोटाची खळगी भरण्यास साथ दिली; त्यानेच घेतला जीव 

दुर्दैवी! ज्या झाडाने पोटाची खळगी भरण्यास साथ दिली; त्यानेच घेतला जीव 

Next
ठळक मुद्देया मृत व्यक्तीचं नाव नाथूराम चुनालाल मौर्य (४८) असं आहे. मौर्य यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी परळ येथील के.ई.एम रुग्णालयात दाखल केला आहे.काळाचौकीच्या अभ्युदयनगर परिसरात न्यू शिवाजी नाइट हायस्कूलच्या समोर हे मोठं झाड होतं.

मुंबई - आज काळाचौकी परिसरातील अभ्युदय नगर येथील न्यू शिवाजी नाईट हायस्कुलनजीक झाड कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. या मृत व्यक्तीचं नाव नाथूराम चुनालाल मौर्य (४८) असं आहे. त्याचं या झाडाखाली चप्पलाचं दुकान होतं. आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास हे झाड कोसळलं आहे. मात्र, काळाचौकी परिसरात गेले अनेक वर्ष मौर्य हे या झाडाखाली चप्पलचे दुकान चालवत होते आणि स्वत: सह आपल्या कुटुंबीयांची पोटाची खळगी करत होते. मात्र, ज्या झाडाने उदरनिर्वाहासाठी साथ दिली. तेच झाड मौर्य यांच्या अंतास कारणीभूत ठरलं. 

काळाचौकीच्या अभ्युदयनगर परिसरात न्यू शिवाजी नाइट हायस्कूलच्या समोर हे मोठं झाड होतं. आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास हे झाड कोसळलं आणि चप्पलाच्या दुकानावर कोसळलं. या दुर्घटनेत चप्पलच्या दुकान मालकाचा जागीत मृत्यू झाला. पोलिसांना माहिती मिळताच काळाचौकी पोलीस घटनास्थळी पोचले. काळाचौकी पोलीस ठाणे या घटनास्थळापासून जवळपास ५० मीटर आहे. पोलिसांनी मौर्य यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी परळ येथील के.ई.एम रुग्णालयात दाखल केला आहे. तर घटनास्थळी स्थानिक आणि काळाचौकी पोलिसांकडून मदतकार्य सुरू केले होते. या प्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहे.

Web Title: Unfortunately! The tree that helped to fill the stomach; that tree took life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.