मुंबई - कोहिनूर मिल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील अनियमिततेबाबत शिवसेनेचे जेष्ठ नेते मनोहर जोशी व कोहिनूर समूहाचे संचालक उन्मेष जोशी व त्यांचे तत्कालिन भागीदार राजन शिरोडकर यांची सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीचा ससेमिरा अद्याप संपलेला नाही. बुधवारी त्यांच्याकडून पुन्हा आठ तास कसून विचारणा केलेली असून सोमवारी (दि.२६) त्यांना पुन्हा कार्यालयात पाचारण केलेले आहे.कोहिनूर स्केअर टॉवर प्रकल्पाच्या प्रारंभापासून करण्यात आलेला व्यवहार आणि त्यासंबंधीच्या दस्ताऐवजाबाबत दोघांकडून सविस्तर माहिती घेतली जात आहे. त्यासाठीजोशी व शिरोडकर यांना एकत्र तसेच स्वतंत्र बसून विचारणा करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दादर (प) शिवसेना भवनासमोरील कोहिनूर मिल-३ या जागेत उभारल्या जाणाऱ्या कोहिनूर स्केअर टॉवरच्या २१०० कोटीच्या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ईडीला संशय आहे. इन्फ्रास्ट्रकचर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेसद्वारे (आयएल अँड एफएस) कंपनीचे थकीत कर्जाच्या अनुषंगाने मनसे अध्यक्ष व कोहिनूर समूहाचे तत्कालिन भागीदार राज ठाकरे यांच्यासह जोशी व शिरोडकर यांची चौकशी सुरु केली आहे. सोमवारी व मंगळवारी जोशी यांची सलग आठ तास चौकशी केली होती. तर शिरोडकर यांच्याकडे काल पाच तास चौकशी करण्यात आली. दोघांना आजही कार्यालयात बोलाविल्याने ते अकराच्या सुमारास हजर झाले. कोहिनूर टॉवरच्या व्यवहरासंबंधीची कागदपत्रे त्यांनी अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. दोघांची एकत्र तसेच स्वतंत्रपणे विचारणा करण्यात आली. सुमारे सातच्या सुमारास ते कार्यालयातून बाहेर पडले. त्यांच्याकडील चौकशी अपूर्ण राहिल्याने सोमवारी सकाळी अकरा वाजता पुन्हा बोलाविण्यात आले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी जोशी यांच्याकडे आतापर्यंत जवळपास ३६ तास तर शिरोडकर यांनी १३ तास ईडीच्या कार्यालयात हजेरी लावले आहे.
उन्मेष जोशी, राजन शिरोडकर यांच्या चौकशीचा ससेमिरा कायम; आजही झाली ८ तास चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 9:00 PM
ईडीकडून बुधवारीही आठ तास प्रश्नांचा भडीमार; सोमवारी पुन्हा हजेरी लावावी लागणार
ठळक मुद्देदोघांना आजही कार्यालयात बोलाविल्याने ते अकराच्या सुमारास हजर झाले.कोहिनूर टॉवरच्या व्यवहरासंबंधीची कागदपत्रे त्यांनी अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. सुमारे सातच्या सुमारास ते कार्यालयातून बाहेर पडले.