Tanker Accident Video: अकोल्याजवळ पेट्रोलचा टँकर पलटी झाला; लोकांनी कॅन भरून भरून नेले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 01:11 PM2021-11-14T13:11:05+5:302021-11-14T13:11:15+5:30
Petrol Tanker Accident in Akola: जिवाची पर्वा न करता लोक हे पेट्रोल, डिझेल कॅन भरून भरून घरी नेताना दिसत होते. याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
पेट्रोल, डिझेल एवढे महाग झालेय की आता लोक 10, 20 रुपयांचे पेट्रोल टाकू लागल्याचे मिम्स व्हायरल होत आहेत. काही ठिकाणी 30 किंवा 50 रुपयांचे पेट्रोलही स्कूटरमध्ये टाकले जात आहे. काही मिम्समध्ये तर पेट्रोल पंपावर नोझलमधून एकेक थेंब पडेपर्यंत फिलरला उचलू नको असे बजावले जात आहे. अशातच अकोल्यामध्ये मोठी घटना घडली आहे.
अकोल्या जवळ नाल्या नजीक पेट्रोल, डिझेलचा टँकर पलटी झाला. यामुळे टँकरमधील हजारो लीटर पेट्रोल, डिझेल सुकलेल्या नाल्यामध्ये साचले. हे पेट्रोल, डिझेल मिळविण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी झाली होती. जिवाची पर्वा न करता लोक हे पेट्रोल, डिझेल कॅन भरून भरून घरी नेताना दिसत होते. याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
अकोल्याजवळ पेट्रोल, डिझेलचा टँकर पलटी झाला... लोकांनी कॅन भरून भरून नेले #Akola#Petrol#ACCIDENThttps://t.co/JkFetXdotupic.twitter.com/fm8hS8wRrp
— Lokmat (@lokmat) November 14, 2021
ही लुटालूट जीवघेणी...
पेट्रोल, डिझेल हे हायली एक्सप्लोझिव्ह आहे. यामुळे थोडीशी जरी ठिणगी पडली तरी देखील ते पेट घेऊ शकते. शेजारी टँकर पलटी झालेला होता. त्यात थोडे जरी स्पार्क किंवा शॉर्ट सर्किट झाले असते तरी तिथे मोठा अनर्थ होऊ शकला असता.