Video : सर्वोच्च न्यायालयाच्या नियमाचे उल्लंघन; फटाके फोडल्याने मुंबईत पहिला गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 04:53 PM2018-11-07T16:53:42+5:302018-11-07T16:57:07+5:30
मंगळवारी ट्रॉम्बे येथे अभ्यंगस्नानाच्या दिवशी दोन तरुणांनी सोसायटीच्या आवारात फटाके फोडले. मध्यरात्री हे फटाके फोडण्यात आल्याने त्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
मुंबई - सूर्वोच्च न्यायालयाच्या ने घालून दिलेल्या मर्यादित वेळेत फटाके न फोडल्याने काल मध्यरात्री म्हणून ट्रॉम्बे पोलिसांनी दोन अज्ञात तरुणांवर गुन्हा दाखल केला असून फटाके वाजविणाऱ्यांचा शोध घेत आहेत. मानखुर्दच्या काही भागात रात्री उशिरापर्यंत फटाके वाजण्यात आले. यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मानखुर्द पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने रात्री आठ ते दहा या मर्यादित वेळेतच फटाके फोडावेत, यासाठी स्थानिक पातळीवर प्रशासानाने नजर ठेवावी, असे निर्देश नुकतेच दिले होते. कोर्टाच्या या निर्णयाची अंमलबजावणी करता यावी म्हणून राज्यभर पोलिसांची विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. मंगळवारी ट्रॉम्बे येथे अभ्यंगस्नानाच्या दिवशी दोन तरुणांनी सोसायटीच्या आवारात फटाके फोडले. मध्यरात्री हे फटाके फोडण्यात आल्याने त्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. मुंबईत हा पहिलाच गुन्हा दाखल झाला असून अज्ञात आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिवाळी सणात रात्री ८ ते १० दरम्यान फटाके फोडण्यास मुभा दिली आहे. त्याशिवाय ख्रिसमस आणि ३१ डिसेंबरदिवशीही रात्री ११.४५ ते १२.१५च्या दरम्यानच फटाके फोडण्याचे बंधन घालण्यात आले आहे. तसेच न्यायालयाने ई-कॉमर्स पोर्टल्सला म्हणजेच ऑनलाईन फटाके विकण्यास बंधन आणले आहे. गुन्हा दाखल झाल्याप्रकरणाचे चित्रीकरण देखील वायरल झाले आहे.