रस्त्याच्या विरुद्ध बाजूने येणाऱ्या डॉक्टरवर चाकूने वार; पिंपरीतील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 08:46 PM2020-10-19T20:46:55+5:302020-10-19T20:48:09+5:30
जाब विचारल्याने भांडण काढून आरोपींनी फिर्यादीच्या सोसायटीच्या पार्किंगसमोर हातावर आणि कंबरेवर केले चाकूने वार..
पिंपरी : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत रस्त्याच्याविरुद्ध बाजूने येऊन समोरच्यास बाजूला हो म्हणणे एका डॉक्टरच्या अंगलट आले. त्यावरून झालेल्या वादात दोघांनी डॉक्टरवर चाकूने वर केल्याची घटना पिंपरीत घडली.
डॉ.प्रवीण रुद्रय्या मठ (वय २९, रा. मॅनोर, अपार्टमेंट, यशवंत नगर पिंपरी) असे चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अजय बाबासाहेब पोळ (रा. निवारा सोसायटी, विठ्ठल नगर, पिंपरी), अप्पा (वय २५) या दोघांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात दुखापत केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी मठ १५ ऑक्टोबरला दुपारी सव्वाचारच्या सुमारास राहत्या घराजवलील रस्त्यावर विरुद्ध बाजूने दुचाकीवरून येत होते. त्यांनी आरोपींना इशाऱ्याने बाजूस होण्यास सांगितले. त्यावरून आरोपींनी शिवीगाळ केली. त्याचा जाब विचारल्याने भांडण काढून आरोपींनी फिर्यादीच्या सोसायटीच्या पार्किंग समोर त्यांच्या हातावर आणि कंबरेवर चाकूने वार करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
चिंचवड येथील महावीर चौकात रात्री सव्वाआठच्या सुमारास ठरले असता दोघा अज्ञात व्यक्तींनी काही कारण नसताना रॉडने दोन्ही हात, पाय आणि मांडीला मारून जखमी केल्याची तक्रार पिंपरी पोलीस ठाण्याचे दाखल झाली आहे. अजय सुरेश कांबळे (वय २६, रा. आनंदनगर झोपडपट्टी, भांडारी चौक, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे.
रिक्षातून जात असताना दुचाकीवरून आलेल्या सावत्र भावंडांनी लाकडी दांडक्याने डोके, खांद्यावर मारहाण केल्याची घटना देहूगाव विठ्ठलवाडी येथे घडली. कुंडलिक नामदेव जाधव (वय ३०) यांनी फिर्याद दिली आहे. अविनाश नामदेव जाधव (वय ३०) याला अटक केली असून, केशव नामदेव जाधव (वय ३१) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
दारूच्या नशेत पत्नीला रॉडने मारहाण केल्याची घटना इंद्रायणीनगर भोसरी येथे उघड झाली. अपर्णा नितीन कांबळे (वय ३६, इंद्रायणी नगर, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नितीन बाबुराव कांबळे याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कांबळे याने १५ ऑक्टोबरला सायंकाळी सहा वाजता दारूच्या नशेत आलेल्या पतीने डावा हात, कंबर आणि दोन्ही पायांवर रॉडने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.