उत्तर प्रदेश : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उन्नाव जिल्ह्यातील एका नर्सिंग होममधील परिचारिकेच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच, पीडित कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याचं लक्षात घेऊन 5 लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. बांगरमाऊ परिसरातील हरदोई-उन्नाव रस्त्याच्या कडेला वसलेल्या दुल्लापुरवा गावाची ही घटना आहे.एक दिवसापूर्वी दुल्लापुरवा येथील न्यू जीवन रुग्णालयात कामावर आलेल्या एका तरुणीचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला होता. तिचा लटकलेला मृतदेह रुग्णालयाच्या पाठीमागील भिंतीवर सळ्यांच्या सहाय्याने आढळून आला. ही घटना बलात्कार आणि हत्या असल्याचे सांगत कुटुंबीयांनी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.मृताच्या आईने नर्सिंग होमचे संचालक नूर आलम, चांद आलम, अनिल कुमार यांच्यासह पाच जणांविरुद्ध सामूहिक बलात्कार आणि हत्येचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. मात्र, सायंकाळी उशिरा आलेल्या पोस्टमॉर्टम अहवालात फासामुळे मृत्यू झाल्याची स्पष्ट झाल्यानंतर या घटनेला नवे वळण मिळाले आहे.रुग्णवाहिका चालकाशी मुलीचे प्रेमसंबंधपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली होती. एसपी आणि एएसपींनी मृताच्या प्रियकराला अटक करून त्याची चौकशी केली आणि नर्सिंग होमचीही पाहणी केली. मृताच्या मोबाईलच्या कॉल डिटेल्सवरून मुलीचे मुस्तफाबाद, बांगरमाऊ येथील संदीप राजपूत याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे सांगण्यात आले. संदीपला पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली.
Amazon विरोधात गुन्हा, 'हे' औषध विकले जात होते प्रिस्क्रिप्शनशिवाय
४० पोलीस घरात घुसले, बहीण आवाज देत राहिली'; वाचवा, कुणाला तरी फोन करा...लग्नास नकार दिल्याने आत्महत्याआरोपीने सांगितले की, तो रुग्णवाहिका चालवतो. त्याचे दीड वर्षांपासून नर्ससोबत प्रेमसंबंध होते. 28 एप्रिल रोजी त्याने मुलीला दुल्लापूरवा येथील न्यू जीवन नर्सिंग होममध्ये परिचारिका म्हणून कामावर घेतले. ही मुलगी दुसऱ्या पंथाची असून त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती. घटनेच्या रात्री तरुणीने संदीपला अनेकदा फोन केला. मात्र, त्याने फोन घेतला नाही. यामुळे मुलगी दुखावली गेली. लग्नास नकार दिल्याने तिने आत्महत्या केल्याचे समजत आहे.