'मी शॉकमध्ये आहे, तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकणार नाही' म्हणताच फसली पत्नी, उघड झालं गुपित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 11:16 AM2022-12-09T11:16:51+5:302022-12-09T11:17:39+5:30
Delhi Crime News : चौकशी दरम्यान पोलिसांना मृतकाच्या पत्नीच्या जबाबात गडबड वाटली. त्यासोबतच पोलिसांना गुप्त सूचना मिळाली होती की, सुरेशच्या हत्येमागे त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर सचिन असू शकतात.
Delhi Crime News : पश्चिम दिल्लीच्या मंडावली भागात एका महिलेने प्रियकरासोबत मिळून आपल्या पतीची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. पोलिसांनी सांगितलं की, 4 डिसेंबरल एक सूचना मिळाली होती की, रेल्वे कॉलनीमध्य राहणाऱ्या सुरेश याला गंभीर स्थितीत एलबीएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. ज्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर या केसची चौकशी सुरू झाली.
याबाबत पोलिसांनी जेव्हा मृत व्यक्तीच्या पत्नीचा जबाब घेण्याचा प्रयत्न केला तर ती म्हणाली की, तिला या घटनेने फार धक्का बसला आहे, त्यामुळे पोलिसांच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर ती देऊ शकणार नाही. मृतकाच्या परिवारातील वेगवेगळे सदस्य दिल्लीच्या वेगवेगळ्या भागात राहत होते. सुरेशच्या मृत्यूच बातमी मिळताच सगळे त्याच्या घरी पोहोचले. पण कुणीच काही संशय व्यक्त केला नाही.
दिल्ली पोलिसांनी 7 डिसेंबर 2022 ला मृत सुरेशचं शवविच्छेदन केलं आणि मृतदेह कुटुंबियांना सोपवला. या दरम्यान पत्नी व मुलासहीत कुटुंबियांचे जबाब नोंदवण्यात आलेत आणि कुणीही मृतकाच्या मृत्यूवर संशय व्यक्त केला नाही. पण मृतकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा दिसत होत्या. पीएम रिपोर्टमध्ये लिहिलं होतं की, सुरेशच्या डोक्याला, मानेला, छाती आणि पोटावर बाहेरून सोबत आतून जखमा आहेत.
सोबतच पीएम रिपोर्टमध्ये असंही लिहिलं होतं की, सुरेशचा मृत्यू श्वास गुदमरल्याने आणि मारहाण केल्याने झाला आहे. त्याच्या लिव्हरलाही इजा झाली होती. त्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केली. हत्येचा सुगावा लागण्यासाठी पोलिसांनी एक टीम तयार केली. त्यांनी पत्नी, मुलगा आणि नातेवाईकांसोबतच शेजाऱ्यांची चौकशी केली. पण काहीच पुरावा सापडला नाही.
चौकशी दरम्यान पोलिसांना मृतकाच्या पत्नीच्या जबाबात गडबड वाटली. त्यासोबतच पोलिसांना गुप्त सूचना मिळाली होती की, सुरेशच्या हत्येमागे त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर सचिन असू शकतात.
पोलिसांनी आपली तपास पद्धत बदलली आणि कठोरपणे चौकशी केली. तेव्हा सुरेशची पत्नी हेमाने सगळं कबूल केलं. त्यानंतर पोलिसांनी तिचा प्रियकर सचिन याला अटक केली. हेमाने पोलिसांना सांगितलं की, गेल्या दोन वर्षांपासून तिचे सचिनसोबत अनैतिक संबंध होते. दोघांना सोबत रहायचं होतं. त्यासाठी त्यांनी सुरेशची हत्या करण्याचा प्लान केला.
घटनेच्या दिवशी हेमा आणि सचिनने सुरेशला खूप दारू पाजली आणि काही वेळाने जेव्हा सुरेश नशेत टल्ली झाला तेव्हा दोघांनी पडदे आणि ओढणीने त्याचा गळा आवळला. तो बेशुद्ध पडेपर्यंत त्याच्या मानेवर आणि पोटावर लाथा मारल्या.