बलात्काराची खोटी तक्रार देणाऱ्या महिलेला २५ हजारांचा दंड; पोलीस कल्याण निधीत पैसे जमा करा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 03:16 AM2020-08-27T03:16:45+5:302020-08-27T03:16:57+5:30

प्रियकराने ड्रग्स घेऊन बलात्कार केल्याची तक्रार महिलेने नालासोपारा पोलीस स्थानकात केली होती.

Woman fined Rs 25,000 for making false report of rape; Deposit money to the Police Welfare Fund | बलात्काराची खोटी तक्रार देणाऱ्या महिलेला २५ हजारांचा दंड; पोलीस कल्याण निधीत पैसे जमा करा

बलात्काराची खोटी तक्रार देणाऱ्या महिलेला २५ हजारांचा दंड; पोलीस कल्याण निधीत पैसे जमा करा

Next

मुंबई : प्रियकराविरोधात बलात्काराची खोटी तक्रार दाखल करणाऱ्या महिलेला उच्च न्यायालयाने २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला.
प्रकरण पुढे चालवायचे नसल्याने तिने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. प्रियकराविरुद्ध खोटी तक्रार केल्यासंदर्भात न्या. आर. डी. धानुका आणि न्या. व्ही. जी. बिश्त यांच्या खंडपीठाने संबंधित महिलेला २५ हजार रुपये दंड ठोठावत ही रक्कम चार आठवड्यांत महाराष्ट्र पोलीस कल्याण निधीमध्ये जमा करण्याचे निर्देश दिले. दंडाची रक्कम भरली नाही, तर मुलाविरोधात गुन्हा रद्द केल्याचे आदेश मागे घेतले जातील, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

प्रियकराने ड्रग्स घेऊन बलात्कार केल्याची तक्रार महिलेने नालासोपारा पोलीस स्थानकात केली होती. गेल्या महिन्यात तिने तक्रार रद्द करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली. कुटुंबीयांच्या दबावामुळे आपण खोटी तक्रार केल्याचे तिने सांगितले.

Web Title: Woman fined Rs 25,000 for making false report of rape; Deposit money to the Police Welfare Fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.