महिलेने कोर्टात दिली याचिका, तुरूंगात असलेल्या पतीसोबत शरीरसंबंधाची मागितली परवानगी!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 11:19 AM2021-03-20T11:19:46+5:302021-03-20T11:23:30+5:30
तुरूंगात असलेल्या व्यक्तीला वंश वाढवण्यापासून रोखलं जाऊ शकत नाही. हायकोर्टाने गृहविभागाकडून याचं उत्तर मागितलं आहे.
हरयाणातील हायकोर्टात एक केस दाखल करण्यात आली असून ज्यात गुरूग्रामच्या एका महिलेने तुरूंगात असलेल्या पतीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याची परवानगी मागितली आहे. महिलेने यासाठी तर्क दिला की, तुरूंगात असलेल्या व्यक्तीला वंश वाढवण्यापासून रोखलं जाऊ शकत नाही. हायकोर्टाने गृहविभागाकडून याचं उत्तर मागितलं आहे.
हत्येचा दोषी आहे पती
याचिका केलेल्या महिलेने सांगितले की, तिच्या पतीला गुरूग्राम कोर्टाने हत्या आणि इतर गुन्हात दोषी ठरवलं आहे. पती २०१८ पासून भोंडसी जिल्हा तुरूंगात बंद आहे. पत्नीने आपल्या याचिकेत सांगितले की, तिला अपत्य हवं आहे आणि यासाठी तिला पतीसोबत शरीरसंबंध ठेवायचे आहेत. (हे पण वाचा : पत्नीने पतीच्या गुप्तांगावर लाथ मारून घेतला त्याचा जीव, लग्नात नाचण्यावरून झाला होता वाद!)
महिलेच्या वकिलाने सांगितले की, मानवाधिकांरानुसार महिलेल वंशवृद्धीचा अधिकार आहे. त्यांच्याकडून सांगण्यात आले की, संविधानाच्या आर्टिकल २१ नुसार त्यांना जीवन आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार आहे. (हे पण वाचा : नोकरी लावतोय, माझी इच्छाही पूर्ण कर; सरकारी क्लार्कचा मेसेज येताच तरुणीला धक्का बसला)
सरकारकडून कोर्टाने मागितलं उत्तर
हायकोर्टाने जसवीर सिंहच्या एका केसचा निपटारा करत पंजाब सरकारला कैद्यांना वंशवृद्धीसाठी पत्नीसोबत शरीरसंबंध ठेवण्याबाबत नीति बनवण्यास सांगितले होते. कोर्टाने हरयाणाच्या अॅडिशनल अॅडव्होकेट जनरलला विचारले होते की, काय राज्य सरकारने जसवीर सिंह केसमध्ये हार्टकोर्टाच्या आदेशावरून अशाप्रकारची काही नीति तयार केली.