महिला पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी स्वीकारला पदभार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 09:27 PM2020-09-09T21:27:54+5:302020-09-09T21:28:25+5:30

गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून शहरात शांतता ठेवू. कुठल्याही प्रकारचा भष्ट्राचार किंवा पेालिसांचे अवैध धंद्याशी आर्थिक व्यवहार खपवून घेतले जाणार नाही.

Women Police Commissioner Aarti Singh taken charge | महिला पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी स्वीकारला पदभार

महिला पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी स्वीकारला पदभार

googlenewsNext
ठळक मुद्देपोलिसाप्रती जनभावना सुधारण्यासाठी आणि पोलिसांची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्न करू, असे नवनियुक्त पोलीस आयुक्त आरतसिंह यांनी बुधवारी रुजु झाल्यानंतर मत वक्त केले. 

अमरावती : नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक पदावरून पदोन्नतीने बदली झालेल्या आयपीएस अधिकारी डॉक्टर आरती सिंह यांनी बुधवारी दुपारी अमरावती पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला त्यानंतर त्या बोलताना म्हणाले की, जनतेच्या सुरक्षेसाठी गुन्हेगारी आणि अवैध व्यवसायांवर अंकूश ठेवण्याचे प्रयत्न राहील. महिला सुरक्षेला प्राध्यान्य देऊन महिलांना आत्मनिर्भर करू.  गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून शहरात शांतता ठेवू. कुठल्याही प्रकारचा भष्ट्राचार किंवा पेालिसांचे अवैध धंद्याशी आर्थिक व्यवहार खपवून घेतले जाणार नाही.

पोलिसाप्रती जनभावना सुधारण्यासाठी आणि पोलिसांची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्न करू, असे नवनियुक्त पोलीस आयुक्त आरतसिंह यांनी बुधवारी रुजु झाल्यानंतर मत वक्त केले. अमरावती शहराला पहिल्या महिला पोलीस आयुक्त म्हणून लाभलेल्या आरतीसिंह 2006 बॅचमधील आयपीएस अधिकारी आहे. गडचिरोली, भंडार आणि नागपूर ग्रामिण विभागात तब्बल 9 वर्ष कर्तव्य बजावले. त्यांना विदर्भाचा चांगला अनुभव आहे. त्यांच्या उत्तम कार्य पध्दतीमुळे त्यांना पोलीस महासंचालक पदक, राज्य सरकारचे विशेष सुरक्षा पदक आणि केंद्र शासनाकडून आंतरिक सुरक्षा पदकाने सन्मानीत करण्यात आले आहे. नागरिकांच्या सहकार्याने अॅक्टीव्ह पोलिसिंग, सर्व सामान्यांची सुरक्षा, महिला सुरक्षेत प्राध्यान्य देणार आहे.

झिरो टॉलरन्स करप्शन
नवनियुक्त पोली स आयुक्त आरती सिंह यांनी शनिवारी रुजू होताच झिरो टॉलरन्स करप्शनबाबत आपले मत स्पष्ट केले. भ्रष्टाचार व अवैध धंधे वाल्याशी संबध ठेवणार्यां पोलिसांवर कारवाई केली जाणार आहे. असे पोलीस आढळल्यास त्यांची गय केली जाणार नाही एका पोलिसामुळे संपूर्ण विभागातील पोलिसांची बदनामी होते. पोलिसांची प्रतिमा मलीन होते. त्यामुळे भष्ट्राचार खपवून घेणार नाही, अशा कर्मचार्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे मत आरती सिंह यांनी स्पष्ट केले.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

सर्वात मोठी बातमी! रियाला अटक, मेडिकलसाठी NCB ची टीम घेऊन जाणार

 

‘रिया ही तर बळीचा बकरा, तिनं सुशांत प्रकरणातील मास्टरमाईंडची नावं उघड करावीत’

 

लज्जास्पद! फेस मास्क घालून केले बेशुद्ध अन् केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

 

एल्गार प्रकरणी ज्योती जगतापसह तिघांना ४ दिवसांची NIA कोठडी

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या फार्महाऊसची रेकी करणाऱ्या तिघांना ATSने केली अटक

 

 

Web Title: Women Police Commissioner Aarti Singh taken charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.