मंदिरातील भगवा ध्वजाच्या सहाय्याने तरुणाचा गळफास
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2019 05:42 PM2019-06-07T17:42:23+5:302019-06-07T17:46:59+5:30
याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव - तालुक्यातील वाकडी येथील आनंदा बाजीराव गायकवाड (३२) या तरुणाने गावातील मंदिरातच तेथील ध्वजाच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ६ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आनंदा गायकवाड हा तरुण मिळेत ते मजुरीचे काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचा. गुरुवारी तो कामावरुन घरी न जाता गावातील मंदिरातच गेला व तेथेच झोपला. सकाळी लोकांनी मंदिराच्या भगवा ध्वजाच्या सहाय्यानेच त्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुटुंबाने त्याला खासगी डॉक्टरांकडे नेले,मात्र डॉक्टरांना त्यास मृत घोषीत केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. गायकवाड याच्या पश्चात पत्नी, दोन मुले व भाऊ असा परिवार आहे.