अकोल्यात भरदिवसा युवकाची चाकूने भोसकून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 06:16 PM2021-02-18T18:16:24+5:302021-02-18T22:07:41+5:30

A youth was stabbed to death in Akola गोपाल शिंदे (२५)असे  मृतकाचे नाव असून, मारेकर्यांनी जुन्या वादावरून त्याची हत्या केल्याची माहिती समोर येत आहे.

A youth was stabbed to death in Akola | अकोल्यात भरदिवसा युवकाची चाकूने भोसकून हत्या

अकोल्यात भरदिवसा युवकाची चाकूने भोसकून हत्या

googlenewsNext
ठळक मुद्देमोठी उमरी भागातील राष्ट्रीय शाळेजवळ हा खुनी थरार घडला.भरदिवसा घडलेल्या या हत्याकांडामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

अकोला: जुन्या वादातून मोठी उमरी येथील रहिवासी गोपाल सुनिल शिंदे नामक युवकाची चाकूने भोसकून हत्त्या केल्याची घटना गुरुवारी टिळक राष्ट्रीय शाळेच्या मैदानात घटली. या प्रकरणी सिव्हील लाईन्स पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यापैकी दोन जण अल्पवयीन असल्याची माहिती आहे. सिव्हील लाईन पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, मृतक गोपाल सुनिल शिंदे (२४) हा मोठी उमरी भागातील गायत्रीनगर स्थित भुईभार लेआऊट परिसरातील रहिवासी होता. प्रेम पांडे व शुभम जगदाडेसह इतर दोन अल्पवयीन मुलांसोबत गोपलचा जुना वाद होता. दरम्यान गुरुवारी दुपारच्या सुमारास गोपाल हा त्याच्या घरी जेवण करीत असताना मारेकऱ्यांनी मृतक गोपाल सुनिल शिंदे याला फोन करून टिळक राष्ट्रीय शाळेच्या मैदानावर भेटायला बोलावले. गोपाल तेथे पोहोचल्यानंतर त्यांच्या शाब्दिक वाद झाले. यानंतर मारेकऱ्यांनी गोपालच्या पोटात आणि पाठीत चाकू भोसकला. तसेच दगडाने हल्ला केला. हल्ल्यात गोपाल गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. थोड्याच वेळात गोपालची हत्या झाल्याचा फोन गोपालच्या आईला आला. त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. मुलाचा मृतदेह पाऊन आईला धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच सिव्हील लाईन पोलीस ठाण्याचे ठाणेदार भानुप्रताप मडावीसह स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. या प्रकरणी पोलिसांनी प्रेम पांडे व शुभम जगदाडे यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांना अटक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: A youth was stabbed to death in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.