लसीचे १०० डाेस राहिले शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:43 AM2021-06-16T04:43:48+5:302021-06-16T04:43:48+5:30

काेराेनाच्या पार्श्वभूमीवर शहरी तसेच ग्रामीण भागात काेराेना लसीकरण करण्यात येत आहे. मागील काही दिवसापर्यंत केंद्रांसमाेर रांगा लागत हाेत्या. परंतु, ...

100 doses of vaccine left | लसीचे १०० डाेस राहिले शिल्लक

लसीचे १०० डाेस राहिले शिल्लक

googlenewsNext

काेराेनाच्या पार्श्वभूमीवर शहरी तसेच ग्रामीण भागात काेराेना लसीकरण करण्यात येत आहे. मागील काही दिवसापर्यंत केंद्रांसमाेर रांगा लागत हाेत्या. परंतु, सध्या काेराेनाचा संसर्ग कमी झाल्याने लाेक लसीकरणाकडे पाठ फिरवू लागले आहेत. असाच अनुभव साेमवारी वडगाव काटी येथे आला. जिल्हा परिषद शाळेतील लसीकरण केंद्रात सुमारे १५९ डाेस उपलब्ध झाले हाेते. परंतु, प्रत्यक्ष लसीकरणासाठी कमी लाेक उपस्थित राहिले. गावातील अवघ्या ५० जणांनीच लस टाेचून घेतली. परिणामी, १०० डाेस परत नेण्याची वेळ आराेग्य विभागावर आली. लसीकरण केंद्रावर सरपंच गौरीशंकर कोडगिरे, उपसरपंच प्रकाश डावरे, प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या शिंदे, काळे, वाकचौरे सर, ग्रामसेवक सुभाष चौगुले, विस्ताराधिकारी रघुनाथ वैरागे, तलाठी अनिल काळे, पोलीस बनसोडे आदी उपस्थित हाेते.

Web Title: 100 doses of vaccine left

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.