चाैदा बचत गटांना १६ लाखांचे कर्ज वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:43 AM2021-02-27T04:43:37+5:302021-02-27T04:43:37+5:30
अर्थसहाय्य - पंचायत समिती सभागृहात पार पडला मेळावा लोहारा : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्तगत तालुका अभियान व्यवस्थापन ...
अर्थसहाय्य - पंचायत समिती सभागृहात पार पडला मेळावा
लोहारा : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्तगत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती लोहारा व महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा सास्तूर यांच्या संयुक्त विद्यमाने १४ महिला स्वयं सहायता गटांना १६ लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आले आहे.
लोहारा पंचायत समिती सभागृहात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कर्जवाटप मेळावा पार पडला. याप्रसंगी त्यांच्या हस्ते उपस्थित गटातील सदस्यांना कर्ज वाटप करण्यात आले. यावेळी महिलांनी कर्जाचा योग्य प्रकारे विनियोग करावा यातून नवीन व्यवसायासाठी उभे करून बॅंकेच्या कर्जाची वेळेत परतफेड करावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. फड यांनी केले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उमदले, गटविकास अधिकारी सोपान अकेले, महाराष्ट्र ग्रामीण बॅंक सास्तूर शाखेचे शाखा व्यवस्थापक सचिन डाके यांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी तालुका अभियान व्यवस्थापक अमोल कासार, तालुका व्यवस्थापक आर्थिक समावेशन प्रणिता कटकदौंड, प्रभाग समन्वयक प्रीतम बनसोडे, बॅंक सखी मालन कांबळे, सीआरपी रेशमा कादरी आदींनी पुढाकार घेतला.