श्रीराम मंदिर निर्माणासाठी २ लाख घरांपर्यंत पाेहाेचणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:27 AM2021-01-09T04:27:12+5:302021-01-09T04:27:12+5:30

श्रीरामांच्या जन्मभूमीवर भव्य मंदिर निर्माण कार्यात गावोगावच्या अधिकाधिक नागरिकांचे योगदान व्हावे आणि त्यांच्या भावना जोडल्या जाव्यात या हेतूने येत्या ...

Up to 2 lakh houses will be constructed for construction of Shri Ram Temple | श्रीराम मंदिर निर्माणासाठी २ लाख घरांपर्यंत पाेहाेचणार

श्रीराम मंदिर निर्माणासाठी २ लाख घरांपर्यंत पाेहाेचणार

googlenewsNext

श्रीरामांच्या जन्मभूमीवर भव्य मंदिर निर्माण कार्यात गावोगावच्या अधिकाधिक नागरिकांचे योगदान व्हावे आणि त्यांच्या भावना जोडल्या जाव्यात या हेतूने येत्या मकर संक्रातीपासून महिनाभरात घरोघरी जावून रामभक्त कार्यकर्ते निधी समर्पण जमा करणार आहेत. जमेल तेवढा निधी प्रत्येक कुटूंबाला समर्पीत करता यावा यासाठी १०० व १००० रूपयांचे कुपण काढण्यात आले. त्यावर असलेले नियोजित श्रीराम मंदिरचे आकर्षक दिवाही त्या कुपनमुळे घरोघरी जाणार आहे. या अभियानात हजारो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. हे अभियान १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या अभियानाच्या आधी तयारीसाठी जिल्ह्यामध्ये येडशी १० जानेवारी रोजी संमेलन होणार आहे. अभियान काळात कोरोनाच्या संख्येची मर्यादा पाळून सर्व ठिकाणी मिरवणूक, भजन, कीर्तन, रियात्रा काढून अभियानाची सुरुवात होणार आहे. यासाठी जिल्हा पातळीवर श्रीराम मंदिर निधी समर्पण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षस्थानी महंत तुकोजीबुवा हे राहणार आहेत.

चौकट...

श्रीराम मंदिर निर्माणासाठी मुंबइ, दिल्ली, चेन्नइ, गुवाहाटी येथील आयआयटी तसेच सीबीआरआय रुरकी व एल ॲण्ड टी, टाटा इंजिनिअरींग सर्व्हीसेसचे तंत्रज्ञ मंदिराचा मजबूत पायासाठी विचार करत आहेत. लवकरच त्याचे स्वरुप अंतिम हाेईल. मंदिराची लांबी ३६० फुट व रुंदी २३५ फुट असणार आहे. प्रत्येक मजला २० फुट उंचीचा असणार आहे. देशातील नव्या पिढीला श्रीरामजन्मभूमी मंदिराचा इतिहास ज्ञात व्हावा यासाठी या अभियानात घरोघरी जावून हा इतिहास सांगितला जाईल.

Web Title: Up to 2 lakh houses will be constructed for construction of Shri Ram Temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.