दाेन दिवसांत ९८ रुग्ण, १० जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:27 AM2021-05-03T04:27:06+5:302021-05-03T04:27:06+5:30
रविवारी मुरुम ग्रामीण रुग्णालयात घेण्यात आलेल्या १३ रॅपिड अँटिजन टेस्टपैकी ४ व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यातील ग्रामीण ...
रविवारी मुरुम ग्रामीण रुग्णालयात घेण्यात आलेल्या १३ रॅपिड अँटिजन टेस्टपैकी ४ व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात २४ रॅपिड अँटिजन टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये सर्व व्यक्तीचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत.
उपजिल्हा रुग्णालय उमरगा येथे घेण्यात आलेल्या ८१ रॅपिड अँटिजन टेस्ट मध्ये ३१ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहेत. उपजिल्हा रुग्णालयातून पाठविलेल्या २६ स्वॅबचे अहवाल आले. त्यात १२ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहेत. शनिवारी तालुक्यात ५१ कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आले होते. यामुळे दोन दिवसांत ९८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. सध्या ६१६ ॲक्टिव्ह रुग्णसंख्या झाली आहे.
सध्या उपजिल्हा रुग्णालय उमरगा येथे ८६, ईदगाह कोरोना केअर सेंटरमध्ये २८, शिवाई हॉस्पिटलमध्ये ३७, शेंडगे हाॅस्पिटलमध्ये ३०, शिवाजी कॉलेज हॉस्टेल ३७, गजानन हॉस्पिटलमध्ये १२, डॉ.विजय पाटील हॉस्पिटलमध्ये १०, मातृछाया हॉस्पिटलमध्ये १०, होम आयसोलेशनमध्ये ११९ रुग्ण आहेत, तसेच आई साहेब मंगल कार्यालयात ५० व मीनाक्षी मंगल कार्यालय २० रुग्ण आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ.अशोक बडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुहास साळुंके व मुरुमचे वैद्यकीय अधीक्षक वसंत बाबरे यांनी दिली.
चाैकट...
तुराेरी येथील कांताबाई गायकवाड या वृद्धेच्या पतीचे शनिवारी रात्री निधन झाले. त्यांची घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. काेणीही बघायला नाही. ही माहिती समजल्यानंतर गटविकास अधिकारी कुलदीप कांबळे हे ग्रामसेवक व कर्मचारी यांना घेऊन कांताबाई यांच्या घरी जाऊन धीर दिला. त्यांची टेस्ट केली असता, पाॅझिटिव्ह आली. यानंतर, समाजसेवक बाबा जाफरी यांच्याशी संपर्क करून, त्यांना दाळींब काेविड सेंटरमध्ये दाखल केले.