१ हजार ८०० शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:29 AM2021-04-19T04:29:45+5:302021-04-19T04:29:45+5:30

उस्मानाबाद : महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील ७० हजार १३८ लाभार्थी शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली असून, जवळपास ५०८ कोटी ...

Aadhaar certification of 1,800 farmers stalled | १ हजार ८०० शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण रखडले

१ हजार ८०० शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण रखडले

googlenewsNext

उस्मानाबाद : महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील ७० हजार १३८ लाभार्थी शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली असून, जवळपास ५०८ कोटी ५१ लाख रुपये कर्ज खात्यात जमा झाले आहेत. दरम्यान, १ हजार ८१९ शेतकऱ्यांचे अद्यापही आधार प्रमाणीकरण झालेले नाही. त्यामुळे त्यांच्या कर्जमाफीचे प्रस्ताव रखडले आहेत.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ या राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत कर्ज घेतलेल्या व ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत व्याजासह २ लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्जाची रक्कम संबंधित पात्र शेतकऱ्यांचा कर्ज खात्यावर शासनातर्फे वर्ग करण्यात येते. या योजनेअंतर्गत संबंधित बँकांनी कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवर शेतकऱ्याचा डाटा भरलेला असून त्यांची छाननी करून पात्र शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थी यादीतील शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर शेतकऱ्याच्या कर्जखात्यात रक्कम वळती करण्याची कार्यवाही सुरू होते. परंतु अद्याप जिल्ह्यातील १ हजार ८१८ शेतकऱ्यांनी त्यांचे आधार प्रमाणीकरण न केल्याने त्यांना योजनेचा लाभ मिळला नाही. त्यामुळे संबंधितांनी लवकरात लवकर प्रमाणीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पॉईंटर...

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेसाठी जिल्ह्यात सहा याद्या प्रसिद्ध झाल्या असून, ७२ हजार ९६२ शेतकरी पात्र ठरले आहेत.

अद्यापर्यंत ७० हजार १३७ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे.

तर १ हजार ८१९ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण रखडले आहे. त्यामुळे कर्ममाफीपासून हे शेतकरी वंचित आहेत.

चौकट...

महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेच्या एकूण ६ याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. एकूण ७२ हजार ९६२ शेतकरी पात्र ठरले आहेत. अद्यापर्यंत ७० हजार १३८ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ५०८ कोटी ५१ लाख रुपयांची रक्कम वर्ग झाली आहे. अद्याप १ हजार ११९ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण राहिले असून, शेतकऱ्यांनी तत्काळ आधार प्रमाणीकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हा उपनिबंधक कार्यालयात करण्यात आले आहे.

आधार प्रमाणीकरण रखडलेले तालुकानिहाय शेतकरी

तालुका शेतकरी संख्या

उस्मानाबाद ४११

तुळजापूर २७२

उमरगा २५२

लोहारा ७०

कळंब ३५३

वाशी २३३

भूम १४६

परंडा ६२

Web Title: Aadhaar certification of 1,800 farmers stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.