आनंदवाडी गावची काेराेनामुक्तीकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:33 AM2021-05-09T04:33:46+5:302021-05-09T04:33:46+5:30
पाथरुड : भूम तालुक्यातील आनंदवाडी गावाची काेराेनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. मागील काही दिवसांत गावातील सुमारे ५० जणांना काेराेनाची ...
पाथरुड : भूम तालुक्यातील आनंदवाडी गावाची काेराेनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. मागील काही दिवसांत गावातील सुमारे ५० जणांना काेराेनाची लागण झाली हाेती. उपचाराअंती ४० जण बरे हाेऊन घरी परतले आहेत. आजघडीला केवळ दहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे मागील दाेन दिवसांत एकही नवीन रुग्ण आढळून आलेला नाही.
भूम तालुक्यातील आनंदवाडी हे जेमतेम एक हजार लोकसंख्येचे गाव. कोरोनाच्या पहिल्या लाटेत गावात एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नव्हता. पहिल्या लाटेत आनंदवाडी हे गाव कोरोनामुक्त होते. परंतु, दुसऱ्या लाटेत आनंदवाडीत कोरोनाने शिरकाव केलाच. हळूहळू मोठ्या प्रमाणावर संसर्ग वाढत गेला. त्यामुळे स्वत: तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी गावात भेट देऊन कोरोना रोगाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. आनंदवाडी येथे कलम १४४ लागू करून निर्बंध लादले हाेते. त्यामुळे काेराेनाचा संसर्ग कमी हाेण्यास मदत झाली आहे. महिनाभरात गावामध्ये जवळपास ५० रुग्ण आढळून आले. यातील चाळीस जण उपचाराअंती बरे हाेऊन घरी परतले आहेत. आजघडीला केवळ १० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एवढेच नाही तर मागील दाेन दिवसांत एकही नवीन रुग्ण आढळून आलेला नाही ही आनंदवाडीकरांसाठी आनंद देणारी बाब आहे. सध्या गावाची काेराेनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
पाॅईंटर...
१. आनंदवाडी येथील कोरोना परिस्थितीबाबत माहिती मिळताच भूमच्या तहसीलदार उषाकिरण श्रृंगारे, उपविभागीय अधिकारी राशीनकर यांनी आनंदवाडी गावास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेत गावात कलम १४४ लागू केले.
२. आनंदवाडी येथे कोरोनाचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून आल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामसेवक सुशेन खंदारे यांनी गावातील परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वांरवार निर्जंतुकांची फवारणी केली.
काेट...
आनंदवाडी येथील पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण सध्या कमी झाले. आजवर ५० रुग्ण आढळून आले. यातील ४० जण बरे हाेऊन घरी परतले. त्यामुळे आजघडीला गावात केवळ दहा ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आजवर एकाचा मृत्यू झाला आहे.
- गंप्पू बाराते, प्राथमिक आरोग्य केंद्र, आंबी.
आनंदवाडी येथील सर्व नागरिकांनी नियमित हात स्वच्छ धुवावेत. लक्षणे असतील तर तातडीने प्राथमिक आराेग्य केंद्रात जाऊन डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा. काेराेनाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या नियमांचे काटेकाेरपणे पालन करावे.
-सुशेन खंदारे, ग्रामसेवक, आनंदवाडी.
आनंदवाडी येथील काेराेनाचा संसर्ग आता आटाेक्यात येऊ लागला आहे. असे असले तरी धाेका अद्याप दूर झालेला नाही. गावातील काेणीही दुखणे अंगावर काढू नये. लक्षणे दिसून येताच आराेग्य केंद्रात जाऊन टेस्ट करून घ्यावी. सर्वांच्या प्रयत्नातून गाव लवकरच काेराेनामुक्त हाेईल.
-बी. वाय. खामकर, सदस्य, आनंदवाडी.