अंनिसचा कळंबमध्ये भल्या सकाळी ‘निर्भय मॉर्निंग वॉक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:37 AM2021-08-21T04:37:15+5:302021-08-21T04:37:15+5:30
कळंब : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनातील मुख्य सूत्रधारास अटक करावी, या मागणीसाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ...
कळंब : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनातील मुख्य सूत्रधारास अटक करावी, या मागणीसाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने कळंब येथील शिवाजी चौक ते पोलीस ठाणे असा ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ काढत पोलिसांना निवेदन दिले.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट, २०२१ रोजी मॉर्निंग वॉक करत असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यास आज आठ वर्षे पूर्ण होत असून, या प्रकरणी संशयित म्हणून काहींना अटक केली असली, तरी खुनामागील मुख्य सूत्रधार कोण, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याचा शोध लावल्याशिवाय विवेकवादी, विचारवंत, सामाजिक कार्यकर्त्यांच्या जिवाला असलेला धोका संपणार नाही, हे दर्शविण्यासाठी कळंबमध्ये शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता छत्रपती शिवाजी चौक ते पोलीस स्टेशन असा अंनिसने निर्भय मॉर्निंग वॉक काढला. यावेळी ‘आम्ही सारे - दाभोळकर, आम्ही सारे पानसरे’ यासह ‘शिवराय, शाहू फुले आंबेडकर-आम्ही सारे दाभोलकर’ दाभोळकर हत्या प्रकरणातील ‘मास्टर माइंड’वर कारवाई झालीच पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या. पोलीस ठाण्यात मुख्य सूत्रधारांना पकडावे. यासंबंधीचे निवेदन देत, डॉ.नरेंद्र दाभोळकरांचा स्मृतिशेष घेत आंदोलनाची सांगता करण्यात आली.
चाैकट...
यांचा होता सहभाग...
यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा कळंबचे प्रधान सचिव अरविंद शिंदे, अध्यक्ष सुरेश धावारे, किशन लोंढे, उपाध्यक्ष प्रा.ईश्वर राठोड, प्राचार्य जगदीश गवळी, ॲड.शकुंतला फाटक सावळे, ॲड.तानाजी चौधरी, सनी कांबळे, सोनू गायकवाड, धनराज खापे, डॉ.साजेद चाऊस, संदीप सूर्यवंशी, रूपेश मानेकर, सिद्धार्थ कांबळे, संतोष लीमकर, डॉ.दादाराव गुंडरे, डॉ.दीपक सूर्यवंशी, प्रा.अनिल जगताप, अमोल सुरवसे, डॉ.दत्ता साकोळे, अशोक चोंदे, धनजंय डोळस, संतोष यादव, प्रताप शिंदे यांसह अंनिसचे कार्यकर्ते. तसेच काही विद्यार्थी उपस्थित होते.