उस्मानाबाद : लातूर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यकारी मंडळ सभेत मराठवाडा विभागीय अध्यक्ष म्हणून उस्मानाबादचे विक्रम पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.अध्यक्षसञथानी राज्याध्यक्ष राजाराम वरुटे होते. यावेळी माधवराव पाटील, राज्य सल्लागार बाळासाहेब काळे, मधुकर काठोळे, सरचिटणीस केशव जाधव, कोषाध्यक्ष तुकाराम कदम, कार्याध्यक्ष लायक पटेल, सल्लागार वसंतराव हारुगडे तसेच जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धैर्यशील पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. कोरोनाजन्य परिस्थितीमुळे या बैठकीसाठी फक्त जिल्हाध्यक्षांना बोलाविण्यात आले होते. त्यामुळे उस्मानाबादचे बिभिषण पाटील, सोलापूरचे शिवानंद भरले, बाबासाहेब झुंबड या जिल्हाध्यक्षांनी शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मांडले.
यावेळी उस्मानाबादचे राज्य उपाध्यक्ष दत्ता गरड, राज्य चिटणीस शिवाजी साळुंके, महिला आघाडी राज्य उपाध्यक्षपदी बबिता अंबुरे यांची राज्य कार्यकाराणीवर निवड करण्यात आली. या सर्वांचा शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.