२८० वाहन चालकांविरूद्ध कारवाई
उस्मानाबाद - माेटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्ह्यातील अठरा पाेलीस ठाणी वा वाहतूक शाखेकडून २८० जणांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यांच्याकडून दंडापाेटीसुमारे ६४ हजार ५०० रूपये वसूल करण्यात आले आहेत. कारवाईची ही माेहीम यापुढेही सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हा पाेलीस दलाकडून सांगण्यात आले.
तुळजापुरात जुगार अड्ड्यावर छापा
उस्मानाबाद -तुळजापूर शहरातील घाटशीळ राेड येथील जुगार अड्ड्यावर पाेलिसांनी छापा मारला. या कारवाईत सहा माेबाईल, स्कुटर व जुगाराचे साहित्य मिळून सुमारे ७० हजार २८० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी प्रसाद राेचकरी, विशाल माने, वैभव मात्रे, समर्थ सिरसाठ, व्यंकट शिंदे यांच्याविरूद्ध तुळजापूर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.
अवैधरित्या दारूविक्री, गुन्हा दाखल
शिराढाेण -कळंब तालुक्यातील शिराढाेन येथील जायफळ राेडलगत असलेल्या एका पत्र्याच्या शेडसमाेर अवैधरित्या दारूविक्री करण्यात येत हाेती. या दारूअड्ड्यावर पाेलिसांनी छापा मारून देशी दारूच्या चाैदा बाटल्या व १८ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. ही कारवाई २२ मार्च राेजी उपविभागीय पाेलीस अधिकारी यांच्या पथकाने केली. या प्रकरणी पिंटू माणिक काेळी याच्याविरूद्ध शिराढाेण ठाण्यात गुन्हा नाेंद करण्यात आला आहे.
हातगाड्यावर अग्नी प्रज्वलित केला
उस्मानाबाद - भूम तालुक्यातील वरूड येथील रविंद्र घुले यांनी पाथरूड बस्थानकालगतच्या रस्त्यावर मानवी जिवीतास धाेका हाेईल, अशा रितीने गाड्यावर अग्नी प्रज्वलित केला. या प्रकरणी घुले याच्याविरूद्ध भूम पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा स्वरूपाची कारवाई रामेश्वर फाटा येथे केली. या प्रकरणी जीवन मिसाळ यांच्याविरूद्ध गुन्हा नाेंद झाला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.
किरकाेळ कारणावरून मारहाण
परंडा -किरकाेळ कारणावरून पाच जणांनी मिळून एकास लाेखंडी गज, काठीने मारहाण केली. ही घटना २० मार्च राेजी शिराळा (मांजरी) येथे घडली. या प्रकरणी परंडा पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शिराळा मांजरी येथील ब्रम्हदेव भारती हे २० मार्च राेजी ११.३० वाजता सिना नदी पात्रात वाहनामध्ये वाळू भरत हाेते. यावेळी त्यांचा पाय घसरल्याने हातातील घमेले समाधान अनिल कदम यांच्या अंगावर पडले. यातून दाेघांमध्ये वाद झाला. यानंतर समाधान व राेहिदास कदम या दाेघा भावांसह हनुमंत व निवास कदम, बाप्पा बाेरकर यांनी ब्रम्हदेव भारती यांस लाेखंडी गज, काठीने मारहाण करून जखमी केले. या घटनेत ते बेशुद्ध पडले. या प्रकरणी ब्रम्हदेव भारती यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरून मारहाण करणाऱ्यांविरूद्ध भादंसंचे कलम ३२६, ५०४, १४३, १४७, १४८, १४९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.