झाड तोडण्यावरून शेतकऱ्यास मारहाण
उस्मानाबाद : बांधावरील झाड तोडण्याच्या कारणावरून एका शेतकऱ्यास शेतशेजाऱ्यानी मारहाण केल्याची घटना रविवारी वडगाव ज. येथे घडली. या घटनेत जखमी झालेल्या शेतकऱ्याने दिलेल्या तक्रारीवरुन येरमाळा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कळंब तालुक्यातील वडगाव ज. येथील शेतकरी अजय संजय रणदिवे यांच्या गट क्रमांक ३५० मधील शेतातील विद्युत खांबावरील तारांमध्ये घर्षण होऊन ठिणग्या पडत होत्या. हा प्रकार बांधावरील झाडांमुळे होत असल्याचे निदर्शनास आल्याने अजय रणदिवे यांनी ही झाडे तोडण्यासाठी रितसर अर्ज करून परवाना मिळविला. त्यानंतर रविवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास ते झाडे तोडण्यासाठी बांधावर गेले होते. यावेळी शेतशेजारी असलेले अण्णासाहेब बाबुराव मुंढे, बाबुराव लिंबा मुंढे, भीमराव अंबादास पाटील, अरविंद पोपट पाटील या चौघांनी झाडे तोडण्याच्या कारणावरून वाद घातला. शिवाय, शिवीगाळ करीत काठीने मारहाणही केली. या घटनेत अजय रणदिवे हे जखमी झाले. त्यांनी येरमाळा ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बालिकेस मारहाण
उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील बेळंब तांडा येथील रोशनी राठोड (वय ११) या मुलीस काठीने मारहाण झाली. ही मुलगी शेतात जनावरे चारत असताना ती जनावरे शेजारच्या शेतातील तुरीच्या भुस्कटावर गेली. याच कारणावरून शेतमालकाने काठीने मारून जखमी केल्याची तक्रार दिल्याने मुरुम ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.