अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आराेपीस सात वर्षे सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:29 AM2020-12-22T04:29:36+5:302020-12-22T04:29:36+5:30
शासकीय अभियाेक्ता सचिन सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीस शाळेच्या गेटवरून अज्ञाताने पळवून नेल्याची तक्रार पीडितेच्या वडिलांनी १७ मार्च ...
शासकीय अभियाेक्ता सचिन सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीस शाळेच्या गेटवरून अज्ञाताने पळवून नेल्याची तक्रार पीडितेच्या वडिलांनी १७ मार्च २०१८ मध्ये आनंदनगर पाेलीस ठाण्यात दिली हाेती. त्यानुसार गुन्हा दाखल झाला हाेता. यानंतर पाेलिसांनी तपास केला असता, पीडिता मैत्रीणीसाेबत घरी येत असताना कळंब तालुक्यातील आश्रुबा उर्फ अशाेक रामलिंग डाेके (वय २३) याने धमकी देऊन पळवून नेले. पीडितेला पुणे येथे नेऊन अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर सदरील आराेपीविरूद्ध पाेलिसांनी भादंविचे कलम ३६३, ३६६ (अ.), ३७६ (२) (आय) (जे), ५०६ व पाेक्साे कायद्याचे कलम ४, ६ नुसार न्यायालयात दाेषाराेपपत्र दाखल केले हाेते. या प्रकरणाची सुनावणी तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जे. राय यांच्या न्यायालयात झाली. सुनावणीदरम्यान सरकार पक्षाच्या वतीने १७ साक्षीदार तपासण्यात आले. शासकीय अभियाेक्ता सचिन सूर्यवंशी यांनी केलेला युक्तीवाद व समाेर आलेले साक्षी, पुरावे ग्राह्य धरून आराेपी डाेके यास ७ वर्षे सक्तमजुरी आणि ३ हजार ८०० रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
चाैकट..
यांच्या साक्ष ठरल्या महत्वपूर्ण...
सरकार पक्षाच्या वतीने सुनावणीदरम्यान जवळपास १७ साक्षीदार तपासण्यात आले. यापैकी पीडिता, पीडितेची मैत्रीण, शाळेचे मुख्याध्यापक तसेच वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. या आधारेच आराेपीस सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.