‘बीडीओं’ हाती झाडू घेऊन उतरले रस्त्यावर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:13 AM2021-02-05T08:13:30+5:302021-02-05T08:13:30+5:30
(फोटो - राहुल डोके ०२) पारगाव - वाशी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विलास खिल्लारे यांनी हाती झाडू घेत पारगावातील ...
(फोटो - राहुल डोके ०२)
पारगाव - वाशी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विलास खिल्लारे यांनी हाती झाडू घेत पारगावातील रस्ते स्वच्छ करून ‘माझं गावं-सुंदर गावं’चा शुभारंभ केला. यानंतर ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच कर्मचा-यांनीही या उपक्रमात याेगदान दिले.
उस्मानाबाद जिल्हा परिषदेअंतर्गत वाशी पंचायत समितीच्या माध्यमातून माझा गाव-सुंदर गाव हा ग्रामस्तरीय कृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीचा यात सहभाग असणार आहे. सहभागी असणाऱ्या ग्रामपंचायतीना शासनाच्या सूचनेनुसार कामकाज करायचे आहे. २२ जानेवारी ते २० मार्च दरम्यानच्या काळात हे ग्रामस्तरीय काम पूर्ण करायची आहेत. त्यात कामकाजाच्या स्वरूपात तिनशे गुणांची प्रश्नावली दिली आहे. त्या-त्या ठिकाणी केलेल्या कामानुसार गुण मिळणार असून, कामाच्या प्रगतीवर गुण मिळून त्यातून क्रमांक काढला जाणार आहे. शिवाय गावातील स्वच्छता ग्रामस्थांच्या सहभागातून होणार आहे. वाशी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विलास खिल्लारे यांनी स्वतः गावात रस्ते झाडून काढून केली. ग्रामविकास अधिकारी प्रवीण देशमुख यांनीही ग्रामपंचायत परिसराच्या नाल्यातील अडकलेली घाण काढली. यावेळी ग्रामपंचायत विस्तार अधिकारी माचवे, विशाल टेकाळे, ग्रा. पं. सदस्य नवनाथ आखाडे, धनंजय मोटे, राजाभाऊ कोळी, कॉ.पंकज चव्हाण, नाना कोळी, श्रीमंत निंगुळे, मनोज औताने, बाळासाहेब आखाडे, सुदर्शन नारटा, मुकेश औताने, प्रकाश रणदिवे, शेषेराव खंडागळे, सुजित कोकणे, आर. ए. डोके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.