लोहाऱ्यात ‘सुंदर माझे कार्यालय’ जाेरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:13 AM2021-02-05T08:13:32+5:302021-02-05T08:13:32+5:30
लोहारा : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत लोहारा पंचायत समिती येथे सुंदर माझे कार्यालय उपक्रम मंगळवारी पार पडला. लोहारा ...
लोहारा : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत लोहारा पंचायत समिती येथे सुंदर माझे कार्यालय उपक्रम मंगळवारी पार पडला.
लोहारा येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कार्यरत सर्व कार्यालयीन कर्मचारी व समुदाय संसाधन व्यक्ती यांची आढावा बैठक गटविकास अधिकारी सोपान अकेले यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. बैठकीमध्ये अकेले यांनी अभियानाचे उदिष्ट व साध्य यांच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. त्यांनी अभियानांतर्गत चालू असलेल्या विविध निर्देशांकाच्या कामाचा आढावा घेऊन संबधिताना काम पूर्ण करून घेण्याबाबत सूचना दिल्या. तसेच इज ऑफ लिविंग, मिशन अंत्योदय, गाव दारिद्र्य निर्मुलन आराखडा १०० टक्के पूर्ण केल्याबद्दल सर्वांचे काैतुक केले. तसेच सुंदर माझे कार्यालय हा उपक्रम २० मार्चपर्यंत राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत कर्मचारी कार्यरत असणाऱ्या आस्थापना विभागामध्ये परिसर स्वच्छता राखणे, ओला व सुखा कचरा वेगळा करणे आदी उपक्रम राबविणेबाबत सूचना प्राप्त आहेत. त्या अनुषंगाने गटविकास अधिकारी अकेले यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित उमेद अभियानाचे कर्मचारी व समुदाय संसाधन व्यक्ती यांनी पंचायत समिती परिसराची स्वच्छता केली. यावेळी कार्यालयीन अधीक्षक प्रभाकर चौगुले, विस्तार अधिकारी, श्रीनिवास पाटील, लेखाधिकारी आर. जे. नवघडे, शरण माळी, उमेद अभियानाचे प्रमुख अमोल कासार, प्रणिता कटकदौंड, सौरभ जगताप यांच्यासह तालुक्यातील समुदाय संसाधन व्यक्ती उपस्थित होते.