उस्मानाबाद : वाढदिवस साजरा करून फेसबुकवर व्हीडिओ अपलोड करणे श्री तुळजाभवानी देवीच्या दोन महंतांसह अन्य पाच व्यक्तींच्या चांगलेच अंगलट आले आहे. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तुळजापूर ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक विकास दांडे यांच्या फिर्यादीवरून १२ एप्रिल रोजी संबंधितांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुळजापूर येथील महंत तुकोजी बुवा यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त १० एप्रिलच्या सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ढेकरी परिसरातील शेतात विशाल रोचकरी, संजय पवार व इतर पाचजणांना एकत्र केले. तोंडाला कोणत्याही प्रकारचे मास्क वा तत्सम साहित्य न बांधता तसेच सोशल डिस्टन्सिंग न राखता वाढदिवसाचा केक कापला. या कार्यक्रमाची ११ सेकंदाची व्हिडिओ क्लिप तयार करून सूरज जगताप या फेसबुक अकाऊंटवर अपलोड केली होती.