काेराेना लसीचे डाेस शंभर, लाेक जमले तीनशे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:27 AM2021-05-03T04:27:04+5:302021-05-03T04:27:04+5:30

आंबी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत १० गावे येतात. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी सकाळी ७ वाजल्यापासून कोरोना प्रतिबंधित लसीकरणासाठी गर्दी केली ...

Carina vaccine dice one hundred, lac collected three hundred | काेराेना लसीचे डाेस शंभर, लाेक जमले तीनशे

काेराेना लसीचे डाेस शंभर, लाेक जमले तीनशे

googlenewsNext

आंबी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत १० गावे येतात. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी सकाळी ७ वाजल्यापासून कोरोना प्रतिबंधित लसीकरणासाठी गर्दी केली होती. तसेच या केंद्रांतर्गत येत नसलेल्या गावातील नागरिकांनीही या ठिकाणी लस घेण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी लस कमी असल्याने ग्रामस्थांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांना बोलावून लसीकरण करण्यात आले. आंबी आरोग्य केंद्र परिसरातील गावांना जवळचे पडत असल्याने या केंद्राला साठा वाढवून द्यावा, अशी मागणी होत आहे.

(कोट)

आंबी आराेग्य केंद्रांतर्गत जवळपास दहा गावे येतात. या गावांची लाेकसंख्या विचारात घेऊन आराेग्य यंत्रणेने लस उपलब्ध करून द्यावी.

- युवराज गटकळ, उपसरपंच.

प्राथमिक आराेग्य केंद्रात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला उपलब्ध लस देणे आमचे कर्तव्य आहे. संबंधित व्यक्ती काेणत्या गावचा आहे, हे विचारण्याचा आम्हाला अधिकार नाही.

-डाॅ. गप्पू बाराते, वैद्यकीय अधिकारी.

Web Title: Carina vaccine dice one hundred, lac collected three hundred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.