यानिमित्त येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले. शहरातील हमीद नगर येथे शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेस व डॉ. भालचंद्र ब्लड बँक (लातूर) यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात ४६ जणांनी रक्तदान केले. मुरूम येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मोहन जाधव व पदाधिकाऱ्यांच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याचे बक्षीस वितरण करण्यात आले. तुगाव येथे कोरोना काळात सेवा देणाऱ्या आशा कार्यकर्ती व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायती अंतर्गत ५००१ वृक्ष लागवड करण्यात येत असून येणेगूर, येळी, औराद येथे वृक्ष लागवडीची सुरुवात करण्यात आली.
मतिमंद विद्यार्थ्यांना स्नेहभोजनाचेही आयोजन करण्यात आले होते. गुंजोटी येथील इंद्रधनू वृद्धाश्रम येथे युवक राष्ट्रवादीच्या वतीने फळ वाटप करण्यात आले. बलसूर जिल्हा परिषद गटामध्ये रोजगार प्रशिक्षण व ‘बेरोजगारी मुक्त सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमास युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. विविध ठिकाणी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात जिल्हा युवक कार्याध्यक्ष बाबा जाफरी, विधानसभा कार्याध्यक्ष अमोल पाटील, युवक विधानसभा अध्यक्ष बाबा पवार, युवक तालुकाध्यक्ष शमशुद्दीन जमादार, शहराध्यक्ष सुशील दळगडे, सांस्कृतिक कला सेलचे गुराप्पा शेटगार, विद्यार्थी अध्यक्ष समर्थ सुरवसे, रणजित गायकवाड, बाळू माशाळ, ओम गायकवाड, ज्योतिराम औरादे, बाळासाहेब बुंदगे, रामदास माशाळ, प्रताप राठोड, अभय पाटील, विजय पाटील, युवराज सूर्यवंशी, मुन्ना कवठे, उमर जमादार, समीर शेख, आजीम शेख, अबूबकर जमादार, नदीम नदाफ यांची प्रमुख उपस्थिती होती.
200821\5311img-20210820-wa0107.jpg
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांचा वाढदिवस सामाजीक उपक्रमांनी साजरा