लहान मुलांची तब्येत बिघडली ओपीडीमध्ये तिप्पट वाढ...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:37 AM2021-08-21T04:37:22+5:302021-08-21T04:37:22+5:30
उस्मानाबाद : गत काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे लहान मुलांना ताप व इतर आजार जडू लागले आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयास ...
उस्मानाबाद : गत काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे लहान मुलांना ताप व इतर आजार जडू लागले आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयास जिल्हा शासकीय रुग्णालयातील बालरुग्ण विभागातील ओपीडी दुप्पटीने वाढली आहे. सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे. मात्र, लहान मुले सर्दी, ताप, खोकला, डेंग्यूसदृश आजाराने त्रस्त झाली आहेत. हे आजार कोरोनाची लक्षणे असलेली असल्याने पालकांची धास्ती वाढली आहे. लक्षणे आढळून येताच अनेक नागरिक बालकांना खासगी डॉक्टरांकडून तपासणी करवून घेऊन जात आहेत. तर जिल्हा शासकीय रुग्णालयातील बालरुग्ण विभागातील ओपीडीही दुप्पटीने वाढली आहे.
५० टक्के मुलांची कोरोना चाचणी
जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या बालरुग्णांना अधिकचा ताप आणि खोकला असेल तर त्यांची कोरोना तपासणी होते.
काळजीपोटी कोरोनाची तपासणी करण्यावर भर दिला जात आहे. हे प्रमाण सरासरी ५० टक्क्याहून अधिक आहे.
ही घ्या काळजी...
तीन दिवसांपेक्षा अधिक काळ ताप, सर्दी, खोकला असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
लहान मुलांच्या खान-पानावर लक्ष ठेवा. उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळा.
पाणी उकळलेले तसेच फिल्टर केलेले प्यावे.
डेंग्यू, मलेरियाची चाचणी
बालरोग तज्ज्ञ म्हणतात...
मागील काही दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे लहान बालकांना सर्दी, ताप, खोकल्याचा त्रास जाणवत आहे. न्यूमोनियाचे रुग्ण आढळून येत आहेत. लक्षणे आढळून येताच नजीकच्या रुग्णालयात उपचार घ्यावेत.
डॉ. नितीन भोसले, बालरोग तज्ज्ञ
पावसाळ्यात दूषित पाणी व दूषित अन्नामुळे लहान बालकांमध्ये टायफाॅइड आढळून येत आहे. तसेच मच्छरांमुळे डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा. तसेच बालकांना उघड्यावरील अन्न खाण्यास देणे टाळावे.
डॉ. यू. आर. बाेराडे, बालरोग तज्ज्ञ
डेंग्यू, मलेरियाची चाचणी
जिल्ह्यात सर्दी, ताप, खोकल्यासह डेंग्यूसदृश आजार व मलेरियाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्याचा बालकांनाही धोका असल्याने लक्षणे आढळून येताच बालकांचीही डेंग्यू व मलेरियाची चाचणी केली जात आहे.