११ केंद्रांवर मिळणार १८ वर्षांपुढील नागरिकांना कोविशिल्डचा डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:35 AM2021-08-22T04:35:30+5:302021-08-22T04:35:30+5:30
मागील अडीच महिन्यांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट येत आहे. त्यामुळे काही अंशी दिलासा मिळाला आहे. मात्र, कोरोना संसर्गाचा धोका ...
मागील अडीच महिन्यांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट येत आहे. त्यामुळे काही अंशी दिलासा मिळाला आहे. मात्र, कोरोना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे नागरिक काेविड प्रतिबंधात्मक लस घेण्यास पुढे येत आहेत. आरोग्य विभागाच्या वतीनेही शहरी तसेच ग्रामीण भागात लसीकरण करण्यावर भर दिला जात आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत लसीचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने रोटेशन पद्धतीने लसीकरण केले जात आहे. रविवारी मुरुम, लोहारा, सास्तूर, तेर, वाशी, भूम ग्रामीण रुग्णालय, तुळजापूर, उमरगा, परंडा, कळंब उपजिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालय या ठिकाणी कोविशिल्ड लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. या केंद्रांवर १८ वर्षांपुढील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती, दिव्यांग यांना लस घेता येणार आहे. ज्या व्यक्तींना पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झाले आहेत, अशा व्यक्तींनी दुसरा डाेस घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.