मराठी साहित्य संमेलनात पुस्तक विक्रेते अन् पोलिसांत पहिल्याच दिवशी वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 04:28 AM2020-01-11T04:28:15+5:302020-01-11T04:28:18+5:30

९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांच्या अध्यक्षतेखाली होत असल्यामुळे त्यांच्या नावाला विविध स्तरातून आक्षेप घेण्यात आला होता.

Controversy between the booksellers and the police on the first day of Marathi Literature Summit | मराठी साहित्य संमेलनात पुस्तक विक्रेते अन् पोलिसांत पहिल्याच दिवशी वाद

मराठी साहित्य संमेलनात पुस्तक विक्रेते अन् पोलिसांत पहिल्याच दिवशी वाद

googlenewsNext

संत गोरोबा काका साहित्य नगरी (उस्मानाबाद) : ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांच्या अध्यक्षतेखाली होत असल्यामुळे त्यांच्या नावाला विविध स्तरातून आक्षेप घेण्यात आला होता. याचेच पडसाद शुक्रवारी ग्रंथ प्रदर्शनात उमटताना दिसले.
ग्रंथदिंडी संमेलनस्थळी आलेली असताना एका ग्रंथविक्री स्टॉलवर शाब्दिक बाचाबाची झाली. संमेलनाध्यक्ष दिब्रिटो यांच्यावरील आक्षेपार्ह पुस्तिका मोफत दिली जात असल्यामुळे पोलीस
अधिकाऱ्यांनी स्वयंसेवकांची चौकशी करीत पुस्तिका व पत्रके ताब्यात घेतली़
‘आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनियुक्त अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना जाहीर आवाहन : खरेखुरे बंधमुक्त व्हा’ ही आनंद हर्डीकर यांनी लिहिलेली पुस्तिका मोफत दिली जात होती़ १५ पानांच्या या पुस्तिकेत दिब्रिटो यांना खुले पत्र लिहिल्याचा मसूदा आहे. पुस्तिकेत दिब्रिटो यांना अनेक प्रश्न विचारले गेले आहेत.
>संमेलनाध्यक्ष यांच्या विरोधातील मजकूर असलेली पत्रके काही व्यक्ती वाटप करीत असून, गोंधळ होऊ शकतो, अशी तक्रार मिळाली होती. त्यानुसार आम्ही संबधित व्यक्तींना भेटून केवळ चौकशी केली, अटक करण्याचा प्रयत्न वगैरे नसून, पोलिसांनी तक्रारीनंतर केवळ चौकशी केली.
- मोतीचंद राठोड, पोलीस उपअधीक्षक, उस्मानाबाद.

Web Title: Controversy between the booksellers and the police on the first day of Marathi Literature Summit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.