संत गोरोबा काका साहित्य नगरी (उस्मानाबाद) : सच्चा आणि वृत्तीगांभीर्याने काम करणारा कोणीही साहित्यकार, कलावंत हा जात, धर्म, देश, वंश यांच्यापलीकडे जाणारा असतो. विशिष्ट विचारांनी भारलेल्या संघटनांनी निर्माण केलेल्या संभ्रमामुळे शरण जाणे खेदकारक आहे.शहाण्या, जाणत्या, सुसंस्कृत वाङ्मयप्रेमींचा विचार न करता या ना त्या गोष्टीने संमेलनाच्या संदर्भात निर्माण केलेल्या अराजकसदृश्य परिस्थितीला दरवेळी सामोरे जावे लागणे हेही खेदकारक आहे. आपण भान ठेवले पाहिजे की, हे किंवा ते झेंडे खांद्यावर घेणे म्हणजे आपण विचारी आहोत, हे सिद्ध करणे नाही. अशा प्रकारे वागणारा खरा विवेकी नव्हे, अशा परखड शब्दांत मावळत्या संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी आपली मते मांडली़ उस्मानाबाद येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची सूत्रे फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर ढेरे बोलत होत्या.देश, धर्म वेगळा असला तरी आणि पुष्कळदा मातृभाषा वेगळी असली तरी मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीवर प्रेम करणारे अनेक लोक मध्ययुगापासून मराठी मातीवर नांदले आहेत, हेही त्यांनी अधोरेखित केले. अरुणा ढेरे पुढे म्हणाल्या, संवादशक्ती आणि आत्मशक्ती गमावलेला एक भयभीत समाज ही आपली ओळख नाही. कोणतीही संस्कृती ही आरोळी देणाऱ्यांच्या, धाक दाखवणाऱ्यांच्या आणि बळजोरी करणाºयांच्या आक्रमकतेवर तरलेली नाही. ती साध्या, सामान्य माणसांच्या सत्शील कृत्यांवर आणि ज्ञानवंतांच्या सशक्त विचारांवर तरलेली आहे.अत्यंत भ्रष्ट काळाचे प्रतिनिधी म्हणून उद्याच्या जगाने आपल्याला ओळखू नये, असे वाटत असेल तर आपला आंतरिक आवाज लावून धरणारे आणि नव्या पिढीवर विश्वास टाकणारे विवेकी लेखक आणि वाचक म्हणून आपली ओळख निर्माण करण्याच्या, घट्ट करण्याच्या आणि टिकवण्याच्या प्रयत्नात राहूया, असेही त्या म्हणाल्या.>उस्मानाबाद सांस्कृतिकदृष्ट्या समृद्धमहानगरांपेक्षा कितीतरी लहान असलेल्या व २३ टीएमसी पाण्याचा अनुशेष भरून निघेल याची वाट पाहत दुष्काळ अनुभवणाºया; पण सांस्कृतिकदृष्टया समृद्ध असलेल्या उस्मानाबाद परिसरात होत आहे, ही आनंदाची बाब असल्याचे ढेरे म्हणाल्या़>भारतीय भाषांशी स्नेह जोडण्याची परंपरा खंडितपरभाषक साहित्यकाराला आमंत्रित न करण्याच्या महामंडळाच्या निर्णयाने भारतीय भाषा मंडळाशी स्नेहसंवाद करीत राहण्याची एक वाट बंद झाली आहे, अशी माझी भावना आहे. आपण भारतीय भाषांशी स्नेह जोडण्याची एक सुंदर परंपरा खंडित केली आहे, असे मला वाटते.
झेंडा घेऊन अराजकता निर्माण करणे म्हणजे अविवेक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 4:11 AM