उस्मानाबाद पलिकेच्या सभेत दाेनशेवर ठरावांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:29 AM2020-12-22T04:29:39+5:302020-12-22T04:29:39+5:30

उस्मानाबाद - नगर परिषदेच्या साेमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत शहरातील विकास कामांच्या अनुषंगाने तब्बल २२३ ठराव मंजुरीसाठी ठेवण्यात आले. विद्यमान ...

Danshevar resolutions approved in Osmanabad Palika meeting | उस्मानाबाद पलिकेच्या सभेत दाेनशेवर ठरावांना मंजुरी

उस्मानाबाद पलिकेच्या सभेत दाेनशेवर ठरावांना मंजुरी

googlenewsNext

उस्मानाबाद - नगर परिषदेच्या साेमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत शहरातील विकास कामांच्या अनुषंगाने तब्बल २२३ ठराव मंजुरीसाठी ठेवण्यात आले. विद्यमान पदाधिकार्यांच्या हाती अवघ्या वर्षभराचा कालावधी उरल्याने सविस्तर चर्चा करीत दाेनेशेवर ठरावांना मंजुरी देण्यात आली. तर दुसरीकडे शाळांच्या अनुषंगाने कठाेर पाऊले उचलण्याचे एकमुखी ठरले. ज्या शाळांचा पट ५० हाेणार नाही त्या शाळा बंद करून करण्यात येणार आहेत. अशा शाळांची संख्या तब्बल १७ एवढी असल्याने गुरूजींचे धाबे दणाणले आहेत.

नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, उपाध्यक्ष अभय इंगळे व मुख्याधिकारी येलगट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत साेमवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास सर्वसाधारण सभेला सुरूवात झाली. सफाई कामगारांच्या वारसांना नाेकरी देण्याचा विषय चर्चेला आला. या विषयाच्या अनुषंगाने सखाेल चर्चा झाल्यानंतर त्यास मान्यता दिली. यानंतर घनकचरा व्यवस्थापन, राेटरी सेवा ट्रस्टची करमाफी, गणेश विसर्जन विहिरीचे बांधकाम करणे, मुख्याधिकारी निवास्थानाला लागून असलेल्या उद्यानाच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम करणे यासह विषय पत्रिकेवरील सुरूवातीच्या २९ ते ३० विषयांवर जाेरदार चर्चा झाली. चर्चेअंती जवळपास सर्वच विषयांना मान्यताही देण्यात आली. दरम्यान, ॲड. मिलिंद पाटील, ॲड. श्रीकृष्ण मसलेकर यांनी नगर परिषद आरक्षण क्र. ५१ मधील आपल्या मालकीचे ३ हजार ३०० चाैमी क्षेत्र वगळण्यात यावेत, असा अर्ज केला हाेता. त्यानुसार याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचा ठराव मांडण्यात आला, असता नगरसेवक गणेश खाेचरे, उदय निंबाळकर यांनी विराेध केला. त्यामुळे मतदान घ्यावे लागले. त्यामुळे दाेन विरूद्ध इतर अशा फरकाने हा ठराव मंजूर करण्यात आला.

चाैकट...

वेतनावर खर्च, पट का वाढत नाही?

नगर परिषदेच्या माध्यमातून शहरामध्ये जवळपास २६ शाळा चालविल्या जातात. या सर्व शाळांचा पट १ हजार ५८७ इतका आहे. यांना ज्ञानदान करण्यासाठी ८२ शिक्षक कार्यरत आहेत. वेतनासह इतर अनुषंगीक बाबीवर प्रतिमहा शासनाच्या तिजाेरीतून दीड काेटी खर्च हाेत आहेत. असे असतानाही तब्बल १७ शाळांचा पट ५०पेक्षा कमी आहे. ही बाब गंभीर असल्याचे अनेक सदस्यांनी मत नाेंदविले. सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन ज्या शाळांचा पट ५० हून कमी आहे, त्यांना जून २०२१ पर्यंत संधी देण्यात आली आहे. यानंतरही ज्या शाळांचा पट ५० च्या आत असेल त्या शाळा एक किमी अंतरावर असलेल्या शाळेत मर्ज करण्याचा ठरावा पारित करण्यात आला. अतिरिक्त हाेणार्या शिक्षकांना जिल्हा परिषदेकडे परत पाठविले जाणार आहे.

गुन्हे नाेंदविण्याचे आदेश...

अधिकार नसतानाही एका कर्मचार्याने वीस ते बावीस लाेकांना ‘आठ-अ’ दिले. हा मुद्दा नगरसेवक उदय निंबाळकर यांनी मांडल्यानंतर त्यावर सविस्तर चर्चा झाली. चर्चेअंती संबंधित कर्मचार्याचे निलंबन करून पाेलिसांत गुन्हा नाेंदविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

‘गुणवंतां’चा हाेणार गाैरव

शिक्षण, क्रीडा, साहित्य तसेच काेराेना काळात सेवा दिलेल्या डाॅक्टरांचा गाैरव करण्याचा निर्णय साेमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. हा साेहळाही लवकर घेण्याचे यावेळी निश्चित झाले.

विकास कामांसाठी निधी मागणार...

पालिकेकडून आजवर विकास कामांचे विविध ठराव घेण्यात आले आहेत. कामेही हाती घेण्यात येत आहेत. परंतु, आवश्यक तेवढी कामे सुरू करण्यासाठी आणखी निधीची गरज भासणार आहे. त्यामुळे निधी मागणी करण्याचा ठरावही या निमित्ताने पारित करण्यात आला.

Web Title: Danshevar resolutions approved in Osmanabad Palika meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.