अपहारप्रकरणी चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:38 AM2021-02-17T04:38:30+5:302021-02-17T04:38:30+5:30

नंदूराम आश्रमशाळेत जयंती साजरी बलसूर : उमरगा तालुक्यातील बलसूर येथील नंदूराम प्राथमिक आश्रमशाळा व सखूबाई माध्यमिक आश्रमशाळेत श्री संत ...

Demand for inquiry in embezzlement case | अपहारप्रकरणी चौकशीची मागणी

अपहारप्रकरणी चौकशीची मागणी

googlenewsNext

नंदूराम आश्रमशाळेत जयंती साजरी

बलसूर : उमरगा तालुक्यातील बलसूर येथील नंदूराम प्राथमिक आश्रमशाळा व सखूबाई माध्यमिक आश्रमशाळेत श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक तात्याराव चव्‍हाण यांच्या हस्ते सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक मोहन राठोड, राणाप्रताप जाधव, भारत कांबळे, हरी लवटे, उद्धव वाकडे, उद्धव कांबळे, रोहिदास जाधव, अनिल चव्हाण, महादेव पुजारी, संतोष राठोड, राजू सोलंकर, जनाबाई चव्हाण आदी उपस्थित होते.

गणेश जयंतीनिमित्त परंड्यात कार्यक्रम

परंडा : येथील जय भवानी गणेश मंदिरात गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. महिला मंडळांनी गणेश जन्माचा पाळणा बांधून गणेशाचे स्वागत केले तसेच महाआरती करण्यात आली. या उत्सवासाठी जय भवानी गणेश मंडळाचे अण्णा लोकरे, सनी काशीद, हणमंत हातोळकर, विशाल काशीद, आदित्य नागरे, कुणाल जाधव, धीरज ठाकूर, अतुल काशीद, आकाश काशीद, शुभम काशीद, संतोष भालेकर, ओंकार काशीद, विनायक काटवटे, करण काशीद, वैभव मस्के आदींनी पुढाकार घेतला.

पालिका सभागृहात अभिवादन कार्यक्रम

नळदुर्ग : श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथील नगर परिषदेच्या सभागृहात प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेविका छमाबाई राठोड, कर निर्धारण अधिकारी अजय काकडे, नितीन पवार, शहाजी येडगे, ज्योती बचाटे, तानाजी गायकवाड, वैभव जाधव, दत्ता राठोड, विशाल जाधव, रवी राठोड, दिलीप राठोड, आकाश जाधव, प्रवीण जाधव, कैलास चव्हाण, अमर पवार, प्रवीण चव्हाण, गोविंद जाधव, संजय जाधव आदी उपस्थित होते.

गणेश पादुकांची तुळजापुरात मिरवणूक

तुळजापूर : शहरातील पावणारा गणपती मंदिरात गणेश जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त गणेश पादुकांची मिरवणूक काढण्यात आली तसेच रात्री भजन, कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. मंडळाचे अध्यक्ष सज्जन साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव पार पडला. दुपारी शेकडो महिलांच्या उपस्थितीत गणेश जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित महिलांनी गणेश गीते गायिली.

गांधी विद्यालयात आरोग्य जनजागृती

अणदूर : तुळजापूर तालुक्यातील हंगरगा (नळ) येथील राजीव गांधी विद्यालयात नेहरू युवा मंडळ व ग्राम ऊर्जा फाऊंडेशन यांच्यावतीने आरोग्य जनजागृती व मोफत मास्क वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक राजकुमार ठोंबरे, शिक्षक मनोहर घोडके, प्रवीण गुरव, प्रकाश बनसोडे, नागरिक संजय वाघोले, दयानंद चौगुले, अंबादास घोडके, अहमदअली पटेल, शरिफोद्दीन पटेल आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष ज्योतीराम सोनके यांनी केले होते.

मासिक बैठकीत बदलीबाबत ठराव

उस्मानाबाद : तालुक्यातील उपळे (मा) येथील डॉ. प्रवीणकुमार शेटे यांची इतरत्र बदली करु नये, असा ठराव ग्रामपंचायतीने मासिक बैठकीत घेतला आहे. या ठरावाची प्रत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही देण्यात आली आहे. डॉ. शेटे यांनी कोरोना काळात चांगले काम केल्याचे ग्रामपंचायतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर सरपंच सुवर्णा पडवळ, उपसरपंच दगडू खामकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

रस्त्याची चाळण

(रस्त्याचा फोटो)

परंडा : पैठणच्या संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचा मुख्य मार्ग असलेल्या परंडा ते मुंगशी या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून झालेली दुरवस्था कायम आहे. या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, त्याच्या दुरुस्तीची मागणी होत आहे.

कोरोनाची भीती दूर

(कोरोना लोगो)

उस्मानाबाद : जिल्ह्यात बाजारपेठा, वाहतूक सेवा सुरळीत सुरु झाली असून, नागरिकांच्या मनातून कोरोनाची भीती दूर झाल्याचे दिसत आहे. यामुळेच आता मास्क, फिजिकल डिस्टन्सकडे नागरिकांचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

अंधाराचे साम्राज्य

उस्मानाबाद : शहरातील बँक कॉलनी भागातील अनेक पथदिवे बंद आहेत. यामुळे रात्रीच्यावेळी या भागातील रहिवाशांची मोठी गैरसोय होत असून, पालिका प्रशासनाने दिवे तातडीने सुरू करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

वाहतूक कोंडी

कळंब : शहरातील अनेक भागात अस्ताव्यस्त पार्किंग तसेच मोकाट जनावरे यामुळे वारंवार वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत असून, यातून छोटे-मोठे अपघात होण्याची शक्यता आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

सुविधांचा अभाव

उमरगा : शहराच्या हद्दवाढ भागात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती झाली आहे. परंतु, पालिका प्रशासनाकडून अनेक ठिकाणी अद्याप रस्ते, नाले, वीज या मुलभूत सुविधाही पुरविण्यात आलेल्या नाहीत. यामुळे येथील रहिवाशांची गैरसोय होत आहे.

Web Title: Demand for inquiry in embezzlement case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.