दंडात्मक कारवाईसाठी पथके तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:33 AM2021-05-09T04:33:50+5:302021-05-09T04:33:50+5:30
काेराेनाची दुसरी लाट दिवसागणिक अधिक तीव्र हाेऊ लागली आहे. शहरांसाेबतच ग्रामीण भागातही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. काेराेनाचा हा संसर्ग ...
काेराेनाची दुसरी लाट दिवसागणिक अधिक तीव्र हाेऊ लागली आहे. शहरांसाेबतच ग्रामीण भागातही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. काेराेनाचा हा संसर्ग राेखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी लाॅकडाऊनचे निर्बंध अधिक कठाेर केले आहेत. नियमांचा भंग करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाईचे निर्देशही दिले आहेत. आदेशाची काटेकाेरपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी स्वतंत्र पथके तैनात करण्यात आली आहे. यामध्ये एक फिरते पथक असेल. ते शहरात काेठेही कारवाई करू शकते. या पथकाचे प्रमुख सज्जनराव गायकवाड हे आहेत. त्यांच्या साेबतीला पाच कर्मचारी देण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चाैक ते महाद्वार परिसरात कारवाईसाठी वैभव पाठक यांचे पथक तैनात केले आहे. करनिर्धारक वैभव अंधारे यांचे पथक बसस्थानक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, कमान वेस, राज्य रस्ता परिसरात कारवाईसाठी तैनात असेल. दरम्यान, आदेश मिळताच सकाळी सात वाजल्यापासून कारवाई सुरू केली आहे.
चाैकट...
उस्मानाबाद रोड येथील मलबा दुकान संकुलातील दुकानदार वारंवार सूचना देऊनही कोरोनाचे नियम तोडून साहित्यविक्री करताना दिसून आले. त्यांना पाच हजार रुपये दंड केला आहे. ही कारवाई वैभव अंधारे यांच्या पथकाने केली. शिवाय इतर ११ व्यक्ती विनामास्क फिरताना आढळून आल्या. त्यांच्याकडून एक हजार ४०० रुपये दंड वसूल केला.
पाॅईंटर...
तुळजापूर शहरासह ग्रामीण भागातही काेराेनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी अकारण घराबाहेर पडू नये. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे तंताेतंत पालन करावे, असे आवाहन नगराध्यक्ष सचिन राेचकरी, मुख्याधिकारी आशिष लाेकरे यांनी केले आहे.