बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी चारुशीला देशमुख, अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त सी. बी. कोडगिरे, वजन मापेचे गणेश मिसाळ या शासकीय सदस्यांशिवाय वेबिनारद्वारे प्रा. हेमंत वडणे, शशिकांत वाघ, सुशील कुलकर्णी, शरद वडगावकर, सचिन कवडे, माई पवार, संतोष केंडाळे आदी अशासकीय सदस्य उपस्थित होते. यावेळी सचिन कवडे यांनी जिल्ह्यातील अवैध गुटखा विक्रीचा मुद्दा मांडला असता अन्न व औषध प्रशासनाचे कोडगिरे यांनी जिल्ह्यात आतापर्यंत २० ठिकाणी कारवाया करून ७२ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आल्याचे सांगितले. तसेच अन्न व औषध प्रशासनासह पोलिसांनाही कारवाईचे अधिकार दिल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यातील तहसीलमधील सेतू सुविधा केंद्र सुरु करावेत, महा-ई-सेवा केंद्र आणि आपले सरकार केंद्र सुरु करण्याची जाहिरात देऊन अर्ज मागवून त्यांना रितसर परवानगी द्यावी, शेतकऱ्यांना ई-सातबारा घेता यावा म्हणून सातबाऱ्याच्या नोंदी अपडेट ठेवण्याचे निर्देश तलाठ्यांना द्यावेत, आदी सूचना प्रा. वडणे केल्या. कोरोनाकाळात रुग्णांना अतिरिक्त बिल देऊन लुबाडणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईची मागणी केंडवे यांनी केली. यावर आवले यांनी यासाठी जिल्हा शल्य चिकित्सांच्या पातळीवर समिती नियुक्त करून संबंधितांना बिल कमी करण्यास सांगितले होते. तथापि, असे प्रकरण पुन्हा निर्देशनास आणल्यास चौकशी करून कार्यवाही केली जाईल, असे सांगितले.
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 5:01 AM