बलसूर - येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात बुधवारी महिला व बालकल्याण विभागाकडून तेजस्वी पाटील, संजना रणखांब, साक्षी साखरे, वैष्णवी चिवरे, शिल्पा कांबळे व पायल तांबाेळी या सहा विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्याध्यापक बब्रुवान आवटे, सुभाष औरादे, संजय गायकवाड आदींची उपस्थिती हाेती.
ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ
उसमानाबाद -पंतप्रधान शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना ३० एप्रिल पर्यंत अर्ज करता येणार आहेत. ही माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद तुंगार यांनी दिली. सर्व माजी सैनिकांच्या पाल्यांनी या याेजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्य समन्वयकपदी गिड्डे यांची वर्णी
उस्मानाबाद - महा एनजीओ फेडरेशनच्या राज्य समन्वयकपदी स्फूर्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गिड्डे यांची निवड करण्यात आली आहे. एनजीओचे मुख्य समन्वयक शेखर मुंदडा व सह संयाेजक विजय वरूडकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. गिड्डे यांच्या निवडीचे सर्वत्र काैतुक हाेत आहे.